अ‍ॅपशहर

फसला बहिष्कार! झिओमीने विकले १० लाख फोन

एकीकडे भारतात अनेक ठिकाणांहून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या येत आहेत, पण प्रत्यक्षात चीनी कंपनी झिओमीने ऑक्टोबरच्या पहिल्या १८ दिवसांत १० लाख स्मार्टफोन्सची विक्रमी विक्री केल्याचा दावा केला आहे. कंपनीचे ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह ली जुन यांनी ही माहिती दिली आहे. झिओमी पाच वर्षात भारताचा टॉप स्मार्टफोन ब्रॅंड बनू शकेल अशी त्यांना खात्री वाटत आहे.

Maharashtra Times 20 Oct 2016, 2:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम xiaomi india claims to have sold 1 million smartphones in 18 days of october
फसला बहिष्कार! झिओमीने विकले १० लाख फोन

एकीकडे भारतात अनेक ठिकाणांहून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या येत आहेत, पण प्रत्यक्षात चीनी कंपनी झिओमीने ऑक्टोबरच्या पहिल्या १८ दिवसांत १० लाख स्मार्टफोन्सची विक्रमी विक्री केल्याचा दावा केला आहे. कंपनीचे ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह ली जुन यांनी ही माहिती दिली आहे. झिओमी पाच वर्षात भारताचा टॉप स्मार्टफोन ब्रॅंड बनू शकेल अशी त्यांना खात्री वाटत आहे.

जुनने आज एक खुले पत्र जारी केले आहे. त्यात ते म्हणतात, 'येत्या ३ ते ५ वर्षात झिओमी भारताची मोठी बाजारपेठ काबीज करेल. परवडणाऱ्या किंमतीत स्मार्ट फिचर देणाऱ्या झिओमीचे वितरण, विक्रीनंतरची सेवा आदिंच्या बाबतीत सुधारणेसाठी गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार आहे.'

कंपनी तर तीन महिन्यात सुमारे १० ते १५ लाख स्मार्टफोन विकते. पण हा टप्पा कंपनीने ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या पंधरवड्यातच गाठला. डिसेंबर २०१६ पर्यंत कंपनी आणखी चांगली कामगिरी बजावेल, असं निरीक्षकांना वाटत आहे. झिओमीने जुलै २०१४ मध्ये ऑनलाइन फ्लॅश सेल्सच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत शिरकाव केला होता. २०१५ मध्ये कंपनीची कामगिरी काहीशी धीमी होती, पण २०१६ मध्ये झिओमीने ऑफलाइन रिटेलमध्येही प्रवेश केला. यावर्षी झिअोमीचे ४ मॉडेल्स आतापर्यंत आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज