अ‍ॅपशहर

पोस्टाची संगणक सेवा पूर्ववत

टपाल विभागाची (पोस्ट) बिघडलेली संगणक सेवा आता पूर्वत सुरू झाली असल्याची माहिती पोस्टल सेवांचे संचालक सईद रशीद यांनी गुरुवारी महाराष्ट्र टाइम्सला दिली. ही सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाली होती. काही टपाल कार्यालयांतून तर ही सेवा पूर्णपणे बंद होती.

Maharashtra Times 31 Mar 2016, 3:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई टपाल विभागाची (पोस्ट) बिघडलेली संगणक सेवा आता पूर्वत सुरू झाली असल्याची माहिती पोस्टल सेवांचे संचालक सईद रशीद यांनी गुरुवारी महाराष्ट्र टाइम्सला दिली. ही सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाली होती. काही टपाल कार्यालयांतून तर ही सेवा पूर्णपणे बंद होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम computer services in post deptt back to normal now
पोस्टाची संगणक सेवा पूर्ववत


टपाल कार्यालयांतून गेल्या काही दिवसांपासून संगणक सुरू नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते. टपाल कर्मचाऱ्यांनाही यातून कसा मार्ग काढावा ते समजत नव्हते. कार्यरत असलेल्या संगणक सर्व्हरवर ताण पडल्याने त्यातील प्रणालीमध्ये बिघाड निर्माण झाला होता. आर्थिक वर्ष संपताना पोस्टातील गुंतवणूक वाढवण्यास उत्सुक असलेल्या अनेक गुंतवणूकदारांना निराश होऊन परतावे लागले होते. यामुळे ग्राहकांमध्ये चीड निर्माण झाली होती.

यातून मार्ग काढण्यासाठी पोस्टाकडून ऑफलाइन गुंतवणूक करून घेण्याविषयीचे आदेश सर्व टपाल कार्यालयांना देण्यात आले होते. मात्र अनेक टपाल कार्यालयांतून ऑफलाइन गुंतवणूक स्वीकारत नसल्याच्या तक्रारी महाराष्ट्र टाइम्सकडे वाचकांनी केल्या. यासंदर्भात विचारले असता संगणक सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन अतिरिक्त सर्व्हर बसवण्यात आल्याचे सईद रशीद म्हणाले. हे सर्व्हर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले असून त्यामुळे या सेवेचा वाग वाढला आहे, याकडेही रशीद यांनी लक्ष वेधले.

पोस्टाची कोअर बँकिंग सेवा १ एप्रिल रोजी व्याज जमा करता यावे याकरता नागरिकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज