अ‍ॅपशहर

अॅक्रुअलचे धोरण

पोर्टफोलिओमध्ये असलेल्या रोख्यांनी देऊ केलेल्या उत्पन्नावर मिळणाऱ्या व्याजावर लक्ष केंद्रित करणारे डेट फंड म्हणजे अॅक्रुअल फंड होय.

Maharashtra Times 12 Jan 2018, 3:00 am
- अॅक्रुअल फंड म्हणजे काय? ड्युरेशन फंडापेक्षा हे फंड वेगळे कसे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accrual strategy
अॅक्रुअलचे धोरण


पोर्टफोलिओमध्ये असलेल्या रोख्यांनी देऊ केलेल्या उत्पन्नावर मिळणाऱ्या व्याजावर लक्ष केंद्रित करणारे डेट फंड म्हणजे अॅक्रुअल फंड होय. त्या तुलनेत, व्याजदर खाली आल्यानंतर होणाऱ्या भांडवल वृद्धीतून उत्पन्न कमावण्यावर ड्युरेशन फंड लक्ष केंद्रित करतात. भांडवली लाभातून अॅक्रुअल फंडांना काही परतावा मिळतो. मात्र हा त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी छोटा हिस्सा असतो. कंपन्यांचे भाग खरेदी करा व ते स्वतःजवळ ठेवा, असे धोरण अॅक्रुअल फंड अवलंबतात. यामध्ये पोर्टफोलिओमध्ये खरेदी केली जाणारी साधने त्यांच्या मुदतपूर्तीपर्यंत त्याच पोर्टफोलिओमध्ये ठेवली जातात. याउलट, ड्युरेशन फंड हे अधिक सक्रिय असतात. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीला लगाम घालण्यात येणार आहे असे संकेत मिळाल्यावर डेट फंड व्यवस्थापक बऱ्याचदा फिक्स्ड इन्कम गुंतवणूकदारांसाठी अॅक्रुअल धोरण सुचवतात.

- गुंतवणूक सल्लागार व फंड व्यवस्थापक फंडांचा हा गट का सुचवतात?

अॅक्रुअल धोरणामुळे रोखे पोर्टफोलिओमध्ये भांडवलाचा ऱ्हास कमी होतो. व्याजदर वाढत असताना ड्युरेशन फंडांच्या तुलनेत हा ऱ्हास कमी असतो. रोख्यांच्या उत्पन्नात ९० बेसिस पॉइंटने वाढ झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढ आणखी पुढे ढकलली जाणार आहे. पोर्टफोलिओमधील चढउतार टाळण्यासाठीही फंड व्यवस्थापक अॅक्रुअल धोरण अवलंबण्याचा सल्ला देतात.

- अॅक्रुअल फंडांमधील गट कोणते? त्यापैकी गुंतवणूकादारंनी कोणते निवडावेत?

क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड व कॉर्पोरेट बाँड फंड असे दोन प्रकारचे अॅक्रुअल फंड प्रामुख्याने असतात. बाँडच्या रेटिंगमधील विसंगतीकडे क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड लक्ष देतात. एखाद्या बाँडची मूल्ये चांगली असल्यामुळे त्याचे पतमानांकन सुधारणार आहे अशा विश्वास फंड व्यवस्थापकाला आल्यास, त्या बाँडचे भांडवल सुधारल्याची स्थिती निर्माण होऊ शकते. अॅक्रुअल फंड लो-रेटेड रोख्यांमध्येही गुंतवणूक करतात. अशावेळी हा फंड कॉर्पोरेट बाँड फंडापेक्षा अधिक जोखीम घेतो. कॉर्पोरेट बाँड फंड हा चांगल्या दर्जाच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतो.

- कोणत्या गटातील गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी?

निश्चित उत्पन्नामध्ये चढउतार नको असलेल्या गुंतवणूकदारांनी अॅक्रुअल फंडांत गुंतवणूक करावी. हा फंड डेट प्रॉडक्ट आहे, त्यामुळे याच्या साह्याने कराचे नियोजन बँक मुदत ठेवींच्या तुलनेत चांगल्या प्रकारे करता येते. इंडेक्सेशनचा फायदा मिळून उच्च करगटात येणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडांमुळे ३० टक्के प्राप्तिकर भरावा न लागता २० टक्के भरावा लागतो. २० टक्के व ३० टक्के कर गटांत येणाऱ्या गुंतवणूकदारांनाही इंडेक्सेशनचा फायदा मिळतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज