अ‍ॅपशहर

आर्बिट्राज फंड म्हणजे काय?

चलनबदलानंतर अनेक गुंतवणूकदारांनी जंगम साधनांत (फिजिकल) बचत न करता आर्थिक बचत करण्यास सुरुवात केली आहे. जोखीम घेण्याची फारशी तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांना वित्त नियोजक आर्बिट्राज फंड सुचवतात...

Maharashtra Times 16 Dec 2016, 3:00 am
चलनबदलानंतर अनेक गुंतवणूकदारांनी जंगम साधनांत (फिजिकल) बचत न करता आर्थिक बचत करण्यास सुरुवात केली आहे. जोखीम घेण्याची फारशी तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांना वित्त नियोजक आर्बिट्राज फंड सुचवतात...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arbitrage funds
आर्बिट्राज फंड म्हणजे काय?


- आर्बिट्राज फंड म्हणजे काय?

आर्बिट्राज फंडात रोख व डेरिव्हेटिव्ह यांमध्ये फरक असतो, ज्यातून उत्पन्न मिळू शकते. हा फंड रोखीच्या गटात एका कंपनीचे शेअर्स खरेदी करतो आणि डेरिव्हेटिव्ह गटात त्याच कंपनीच्या फ्युचर्सची विक्री करतो. महिनाअखेर कंत्राट संपल्यावर रोख व फ्युचर्स यांच्या एकत्र येण्यातून उत्पन्नाची निर्मिती होते. यामध्ये प्रत्येक रोखीच्या व्यवहारासाठी फ्युच्युर मार्केटमध्ये एक व्यवहार होत असल्याने या फंडांमधून गुंतवणूकदाराचा पैसा थेट इक्विटीकडे जात नाही. हे फंड कमी जोखमीची खरेदी ही कमी जोखमीच्या खरेदी-विक्रीच्या संधींतून करतात आणि पैसा कमावतात. त्यामुळे याचे रिस्क प्रोफाइल हे डेट फंडाप्रमाणे असते. अनेक आर्बिट्राज फंड क्रिसिल लिक्विड फंड इंडेक्स वापरतात.

- आर्बिट्राज फंडामध्ये गुंतवणूकदारांची रुची का?

डेट फंडाचा होल्डिंग कालावधी एक वर्षावरून तीन वर्षे झाल्यानंतर गुंतवणूकदारांची रुची आर्बिट्राज फंडामध्ये वाढली. आर्बिट्राज फंडात ६५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक इक्विटीमध्ये होत असल्याने त्यांना इक्विटी फंडही समजले जाते. दीर्घकालीन भांडवली लाभांसाठी या फंडाचा होल्डिंग कालावधी एक वर्ष असतो. इक्विटीतून मिळणारा दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त असतो, तसेच इक्विटीतून मिळणाऱ्या लाभांशावर लाभांश वितरण कर लागत नाही.

- आर्बिट्राज फंड सुरक्षित आहेत का?

जोखीम कमी असल्याने आर्बिट्राज फंड सुरक्षित असतात. बाजारातून शेअर्सची खरेदी करून फ्युचर्समध्ये विकल्याने फंड व्यवस्थापक एक प्रकारे न्यूट्रल स्थिती निर्माण करतो. बाजारातील चढउतारामुळे या फंडाच्या गुंतवणूकदाराला जोखीम सहन करावी लागत नाही. खरे तर, बाजारात चढउतार असेल तरच आर्बिट्राज फंडात संधी उपलब्ध होतात.

- या फंडात कशाप्रकारे परतावा मिळतो?

स्पॉट व फ्युचर मार्केटमधील संधींवर आर्बिट्राज फंडांतील परतावा अवलंबून असतो. शेअर मार्केटमध्ये अशा संधी अधिक असतात. या प्रकारात व्यवस्थापनांतर्गत मत्तेत (अॅसेट्स) वाढ होत जाते, ज्यामुळे परतावा काहीसा कमी मिळतो. गेल्या वर्षभरापासून या फंडांनी सरासरी ६.९१ टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज