अ‍ॅपशहर

डेट म्युच्युअल फंडाविषयी

अल्पबचत योजना व मुदतठेवी यांचे व्याजदर खाली येत असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांचा ओढा डेट फंडांकडे वाढत आहे...

Maharashtra Times 20 Jan 2017, 3:00 am
१.एकाच प्रकारच्या गुंतवणुकीच्या तुलनेत डेट म्युच्युअल फंडाचे महत्त्व कोणते?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम debt mutual funds
डेट म्युच्युअल फंडाविषयी


सरकारी रोखे, अपरिवर्तनीय ऋणपत्र किंवा बाँडसारख्या एकाच प्रकारच्या गुंतवणुकीच्या तुलनेत डेट फंड तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी मदत करतात. कोणत्याही डेट फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ८ ते १० वेगवेगळ्या योजना असतात, ज्यामुळे तुमची जोखीम सावरली जाते. डेट फंड हे बँक ठेवी, कमर्शियल पेपर, सरकारी रोखे किंवा कॉर्पोरेट बाँड यांतून गुंतवणूक करतात.

२.म्युच्युअल फंडांचे पेपरवर्क सोपे का?

तुम्हाला म्युच्युअल फंडाचे स्टेटमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळू शकते. त्यामुळे तुमच्याकडून म्युच्युअल फंडाचे स्टेटमेंट हरवले तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला फंडाच्या योजनेतून पैसे काढायचे झाल्यास केवळ रिडेम्प्शन स्लिपवर सही करावी लागते व ती स्लिप फंडाकडे द्यावी लागते. याची तुलना बँक ठेवीशी केल्यास, या ठेवीचे प्रमाणपत्र हरवल्यास त्याचे नक्कल प्रमाणपत्र तयार करून घेण्यासाठी बरीच खटपट करावी लागते.

३.डेट फंडात कर व खेळत्या पैशाचे फायदे कोणते?

डेट म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तीन वर्षांसाठी कायम ठेवल्यास त्यावर टीडीएस लागू होत नाही. गुंतवणूकदाराला इंडेक्सेशन लाभ घेऊन कराचा बोजा कमी करता येतो. या फंडातून पैसा काढण्याची गरज असेल तर डेट फंड १ रुपया किमतीच्या युनिट्समध्ये विभागता येतो आणि त्यामुळे गुंतवणूकदाराला हवी तेवढी रक्कम काढून घेता येते. त्यातुलनेत अल्पबचत योजना किंवा मुदतठेव यांतून पैसे काढायचे असल्यास संपूर्ण ठेव मोडावी लागते.

४.डेट फंडात गुंतवणूक केल्यास जोखीम कोणती?

यात अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक होत असेल तर व्याजदर वाढतात, अर्थव्यवस्था नकारात्मक वाटचाल करत असेल तर व्याजदर कमी होतात. त्याचवेळी बाँडची किंमत व व्याजदर नेमक्या उलट्या क्रमाने जातात. म्हणजे व्याजदर वाढले की बाँडची किंमत कमी होते. व्याजदराची जोखीम सर्वच डेट फंडात कमीअधिक असते. दीर्घ कालावधीच्या गिल्ट फंडांना अधिक व्याजदर मिळतो. हा व्याजदर लिक्विड फंडात खूपच कमी अथवा नगण्य असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज