अ‍ॅपशहर

‘ईएलएसएस’द्वारे करबचत

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गुंतवणूकदार करबचत करमाऱ्या योजनांतून गुंतवणूक करताना दिसतात. तुम्ही इक्विटीसंलग्न बचत योजनेमध्ये (ईएलएसएस) पैसा गुंतवून प्राप्तिकर कलम ८०सी अंतर्गत कर वाचवू शकता...

Maharashtra Times 10 Mar 2017, 3:00 am
- करबचत किंवा ईएलएसएस योजना म्हणजे काय? त्यात किती पैसे गुंतवू शकतो?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम et in classroom
‘ईएलएसएस’द्वारे करबचत


इक्विटीसंलग्न बचत योजना अर्थात ईएलएसएस हा करबचत करणारा म्युच्युअल फंड आहे. ईएलएसएस फंड इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांना लाभांश किंवा वृद्धी पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असते. कर वाचवण्यासाठी या योजनेमध्ये तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ईएलएसएस योजना दीर्घकाळासाठी गुंतवणूकदारांना चांगले लाभ देते. परंतु अन्य म्युच्युअल फंडांच्या योजनांप्रमाणे ईएलएसएसमध्येही निश्चित परताव्याची हमी दिली जात नाही.

- ईएलएसएस योजनेत पैसे कसे गुंतवावेत?

गुंतवणूकदाराची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला कोणत्याही अन्य म्युच्युअल फंडाप्रमाणेच ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीसाठी एक अर्ज भरावा लागतो. त्यानंतर एक धनादेश देऊन गुंतवणूक करता येते किंवा ही गुंतवणूक ऑनलाइन करता येते.

- करबचतीखेरीज ८०सी अंतर्गत ईएलएसएसचे अन्य काही फायदे आहेत का?

ईएलएसएसचा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. या तुलनेत सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीसाठी (पीपीएफ) १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीसाठी (ईपीएफ) तुमच्या नोकरीच्या वर्षांइतका लॉक-इन कालावधी असतो. करबचत करणाऱ्या मुदतठेवी किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यांचा लॉक-इन कालावधी पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक असतो. राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे वयाचा लॉक-इन कालावधी असतो. ईएलएसएसमध्ये गरज भासल्यास मध्येच पैसे काढता येतात. लाभांशाचा पर्याय स्वीकारल्यास हे पैसे लाभांशाच्या रूपात काढता येतात, जे करमुक्त असतात. ईएलएसएसमध्ये पैसे काढताना तुम्हाला लाभांशावर कर द्यावा लागत नाही.

- लॉक-इन कालावधी संपल्यावर गुंतवणूकदाराने ईएलएसएस फंडाचे काय करावे?

तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यावर गुंतवणूकदार या योजनेत पैसा गुंतवू शकतो. आपल्या अपेक्षेनुसार फंड परतावा देत असेल तर ईएलएसएसमध्ये गुंतवणूक कायम ठेवण्यास हरकत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज