अ‍ॅपशहर

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

नोव्हेंबर २०१६नंतर, अर्थात नोटाबंदीनंतर वित्त बाजारात प्रवेश करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मार्ग निवडला आहे. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय कसा ते जाणून घेऊ या...

Maharashtra Times 19 May 2017, 3:00 am
माझ्या गरजा भागवण्यासाठी म्युच्युअल फंडाकडे योग्य योजना असतात का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम et in classroom
म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?


- म्युच्युअल फंडांमध्ये विविध योजना असतात. यातील लिक्विड फंडामध्ये तुम्ही अगदी एका दिवसासाठीही पैसे गुंतवू शकता. याशिवाय इक्विटी फंड असतो, ज्यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करता येते. वित्त नियोजकांकडून लिक्विड फंड, डेट फंड, बॅलन्स्ड फंड, आर्बिट्राज फंड, इक्विटी फंड व सेक्टोरल फंड यापैकी योग्य फंड निवडण्याचा सल्ला दिला जातो. ही निवड जोखीम, उद्दिष्टे व हाती असलेला वेळ लक्षात घेऊन करायची असते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती लवचिक राहते?

- आर्थिक योजनांमध्ये म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वाधिक लवचिक साधन आहे. लिक्विड किंवा शॉर्ट टर्म डेट फंडात केलेली गुंतवणूक काढण्यासाठी संबंधित फंडाकडे विनंती केल्यास ती रक्कम कमाल दोन कामकाज दिवसांमध्ये गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा होते. काही लिक्विड फंडांत ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम तत्काळ मिळण्याची सोय असते. इक्विटी फंडांसाठी रक्कम मिळण्यास चार कामकाज दिवस लागतात. फंडामध्ये एकगठ्ठा गुंतवणुकीचा पर्याय असतो किंवा एसआयपीने गुंतवणूक करता येते. एसआयपीसाठी बँक खात्यातून दरमहिना पैसे घेण्याची सुविधाही घेता येते.

थेट इक्विटीच्या तुलनेत म्युच्युअल फंड कोणते लाभ देतात?

- गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड वैविध्य देतात. थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्याकडे एकाच कंपनीचे भाग असतात. त्याचवेळी इक्विटी फंड तुम्हाला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ देतो, ज्यामध्ये एकाचवेळी तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवणूक करता. यामुळे एखाद्या कंपनीच्या समभागाच्या किंमतीत फरक झाला तरी त्याचा थेट परिणाम पोर्टफोलिओवर होत नाही. त्यामुळे तुमची जोखीम कमी होण्यास मदत मिळते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की आपोआप तुम्हाला एक व्यावसायिक फंड व्यवस्थापकही मिळतो, ज्याच्याकडे अर्थव्यवस्थेचा मागोवा घेणाऱ्या व कंपन्यांच्या समभागांचा शोध घेणाऱ्या विश्लेषकांची टीम असते. त्यामुळे कोणते समभाग खरेदी करावेत अथवा विकावेत हे तुम्ही ठरवण्याऐवजी तुमचा फंड व्यवस्थापक ही जबाबदारी पार पाडतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज