अ‍ॅपशहर

मुलांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक

शाळेतील एखादी स्पर्धा जिंकल्यास, क्रीडा प्रकारात यश मिळवल्यास किंवा वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांकडून आपल्या मुलांना कमीअधिक रोकड भेट म्हणून मिळते. ही रक्कम घरातच पडून राहण्यापेक्षा आता पालकांकडून या पैशाच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग स्वीकारला जात आहे....

Maharashtra Times 15 Dec 2017, 1:21 am
शाळेतील एखादी स्पर्धा जिंकल्यास, क्रीडा प्रकारात यश मिळवल्यास किंवा वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांकडून आपल्या मुलांना कमीअधिक रोकड भेट म्हणून मिळते. ही रक्कम घरातच पडून राहण्यापेक्षा आता पालकांकडून या पैशाच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग स्वीकारला जात आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम et in classroom
मुलांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक


लहान मूल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते का? हे कसे करता येते?

म्युच्युअल फंडात १८ वर्षांखालील मुलाच्या नावे गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला वयाची तसेच रकमेची कोणतीही मर्यादा नाही. लहान मुलाच्या नावे गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी त्या मुलाचेच नाव पहिले राहते. त्याच्या फोलिओसाठी संयुक्त धारक चालत नाही. या मुलाच्या फोलिओसाठी पालक म्हणून त्याचे आई-वडील (यापैकी एक) किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती लागते.

कागदपत्रांची पूर्तता वेगळी असते का? कोणती कागदपत्रे लागतात?

लहान मुलाच्या नावे गुंतवणूक करताना त्याच्या वयाचा वैध पुरावा द्यावा लागतो. तसेच तुमचे त्या मुलाशी असलेले नातेही स्पष्ट करावे लागते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या लहान मुलाचा वयाचा दाखला, जन्मदाखला, पासपोर्ट (असल्यास) कॉपी इत्यादी द्यावे लागते. ही सर्व कागदपत्रे पहिली गुंतवणूक करताना किंवा नवा फोलिओ उघडताना द्यावी लागतात. एकाच फंडाच्या त्याच फोलिओमध्ये आणखी गुंतवणूक करताना मात्र ही कागदपत्रे पुनःपुन्हा द्यावी लागत नाहीत. पालकाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे भाग असते. समजा ही गुंतवणूक पालकाच्या बँक खात्यातून केली जात असेल तर त्रयस्थाकडून डिक्लेरेशन करून घ्यावे लागते. तुम्ही ही गुंतवणूक लहान मुलाच्या बँक खात्यातूनही करू शकता.

लहान मुलाच्या नावे एसआयपी सुरू करू शकतो का की केवळ एकगठ्ठा गुंतवणूक करू शकतो?

लहान मुलाच्या नावे असलेल्या फोलिओसाठी आईवडील एसआयपी किंवा एसटीपी सुरू करू शकतात. मात्र यासाठी फंडाला दिलेल्या सूचना ते मूल १८ वर्षांचे होईपर्यंतच वैध राहतात. त्यानंतर एसआयपी किंवा एसटीपी बंद होते. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतरही एसआयपी किंवा एसटीपी चालू ठेवण्याची सूचना फंडाला केली असली तरीही मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर एसआयपी किंवा एसटीपी जमा होणे बंद होते.

मूल १८ वर्षांचे झाल्यावर काय होते?

एकदा मूल १८ वर्षांचे झाले की पूर्वीची एसआयपी व एसटीपी बंद होते. पालकाकडून फोलिओमध्ये कोणताही व्यवहार करता येत नाही. अर्थात लहान मूल १८ वर्षांचे व्हायच्या आधी संबंधित फंडाकडून पालकांना एक नोटीस पाठवली जाते. त्याचबरोबर एक अर्जही पाठवला जातो, ज्यामध्ये त्या मुलाचे स्टेटस बदलण्याची विनंती पालकांना केली जाते. या अर्जाबरोबर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पत्रही जोडावे लागते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज