अ‍ॅपशहर

या इक्विटी म्युच्युअल फंडांचा राैप्य महोत्सव, गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी १७ टक्के परतावा

भारतातील काही इक्विटी म्युच्युअल फंडांना व्यवसायात येऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान त्यांनी वार्षिक सरासरी १७ टक्के रिटर्न गुंतवणूकदारांना दिले आहेत.

guest V-V-Talegaonkar | Lipi 30 May 2022, 4:39 pm

हायलाइट्स:

  • म्युच्युअल फंड उद्योगाचा पसारा वाढला आहे.
  • म्युच्युअल फंडांनी व्यवसायाची २५ वर्षे पूर्ण
  • अडीच दशकात वार्षिक १७ टक्क्यांहून अधिक रिटर्न
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 equity mutual funds completed 25 years
या इक्विटी म्युच्युअल फंडांचा राैप्य महोत्सव, गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी १७ टक्के परतावा
मुंबई : देशातील म्युच्युअल फंड उद्योगाचा पसारा गेल्या काही वर्षात वेगाने वाढला आहे. या क्षेत्रात अनेक कंपन्या आल्या. तर अनेक अन्य बड्या फंड घराण्यात विलिन झाल्या.
इंधन दर; केंद्राची शुल्क कपात, आठवडाभराने कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय
म्युच्युअल फंड योजनांमध्ये इक्विटी अर्थात शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागांशी निगडित अनेक प्रकार आहेत. अशा काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी व्यवसायाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशा फंड योजनांनी गेल्या अडीच दशकात वार्षिक १७ टक्क्यांहून अधिक रिटर्न गुंतवणूकदारांना दिले आहेत.

LIC गुंतवणूकदारांना मिळणार खूशखबर; आयुर्विमा महामंडळ आज करणार 'ही' घोषणा
गेल्याच आठवड्यात आघाडीच्या डीएसपी प्लेक्झी कॅप फंडाने अस्तित्वातील २५ वर्षे पूर्ण केली. ही फंड योजना एप्रिल १९९७ मध्ये बाजारात आली होती. तिने या दरम्यान गुंतवणूकदारांना वार्षिक स्तरावर १९ टक्के रिटर्न दिले आहेत.

वाचा - सोन्याचे भाव वाढतील का? जाणून घ्या कशी राहील सोन्याची पुढील वाटचाल
एचडीएफसी टॅक्स सेव्हर (जी) या इक्विटी म्युच्युअल फंडाने पैकी सर्वाधिक, २३.३४ टक्के रिटर्न दिले आहेत. दुस-या स्थानावर निप्पॅन इंडियाचा ग्रोथ फंड हा २२ टक्के रिटर्नसह आहे. तर सर्वात कमी रिटर्न टॅरस फ्लेक्झी कॅप फंड रेग्युलर (जी) ने दिले आहेत. त्याचबरोबर जेएम लार्ज कॅप फंडाने गेल्या २५ वर्षात एकेरी आकड्यातील रिटर्न दिले आहेत. एक आकड्यात वार्षिक रिटर्न देणा-या प्रमुख इक्विटी फंडांमध्ये एक ते दोन योजनांचा समावेश आहे. अन्य सर्वांनी दुहेरी आकड्यातील परतावा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे.

टाटा समूहाचा गुजरातेत विस्तार; अमेरिकन कार उत्पादक कंपनीचा प्रकल्प खरेदी करणार
एस म्युच्युअल फंडाच्या माहितीनुसार, अशी २५ वर्षे पूर्ण करणा-या इक्विटी म्युच्युअल फंडांची संख्या २६ आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण गंगाजळी १४ लाख कोटी रुपये आहे. पैकी गेल्या २५ वर्षातील फंडांमधील निधी १.५६ लाख कोटी रुपये राहिला आहे.

भारतातील म्युच्युअल फंड उद्योग मार्च २०२२ अखेरिस ४० लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. या क्षेत्रात ४० हून अधिक फंड कंपन्या गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन पाहत आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज