अ‍ॅपशहर

केवळ नॉमिनेशन पुरेसे ठरत नाही

पश्चिम उपनगरातील एका सहकारी सोसायटीच्या इमारतीत माझ्या जावयाने फ्लॅट खरेदी केला आहे. हा व्यवहार फ्लॅटच्या नॉमिनीसोबत झालेला आहे.

Maharashtra Times 4 May 2017, 2:50 am
प्रश्न : पश्चिम उपनगरातील एका सहकारी सोसायटीच्या इमारतीत माझ्या जावयाने फ्लॅट खरेदी केला आहे. हा व्यवहार फ्लॅटच्या नॉमिनीसोबत झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने एका सिव्हिल अपिलासंदर्भात २००६ साली निकाल देताना नॉमिनीला आपल्या मर्जीनुसार फ्लॅट विकण्याचे पूर्ण अधिकार असून, त्यासाठी हरकत प्रमाणपत्र वा वारसापत्र आदी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nomination is not enough
केवळ नॉमिनेशन पुरेसे ठरत नाही


नाही असे स्पष्ट म्हटल्याची माझी माहिती आहे. तरी मार्गदर्शन करावे.

- राम अभ्यंकर, मुंबई

उत्तर : खरे तर आता या टप्प्यावर सल्ला मागण्यापेक्षा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वीच तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यायला हवे होते. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या ज्या निकालाचा संदर्भ दिला आहे, तो तुम्हाला फारसा साह्यकारी होण्यासारखा नाही, कारण सोसायटीने वैध नॉमिनेशनला मंजुरी देऊन फ्लॅट नॉमिनीच्या नावे हस्तांतर करणे आवश्यक आहे. शिवाय निव्वळ नॉमिनेशन आहे, या एकाच आधारावर स्थावर मालमत्तेवर त्याचा अधिकार, प्रस्थापित होत नाही. जर संबंधित सभासदाचा एकच वारसदार असेल व तो नॉमिनीही असेल, तर मालमत्तेचा संबंध त्याच्याशी जोडला जातो. पण जर नॉमिनी वारस नसेल अथवा अनेक वारस असतील, तर मालमत्तेचा अधिकार नॉमिनीला नव्हे, तर वारसांना मिळू शकतो. कोर्टाचा निकाल असे सांगतो, की फ्लॅट नॉमिनीच्या नावावर असतानाही वारस कायदेशीर प्रक्रिया सुरू करून फ्लॅटवरील आपला अधिकार शाबीत करू शकतात. कदाचित तुमच्या जावयाने मालमत्तेचा अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून फ्लॅट खरेदी केलेला असू शकतो. जर फ्लॅटधारकाच्या वारसांनी कोर्टाकडून त्यांचा अधिकार प्रस्थापित करणारा निकाल मिळवला, तर तुमचे जावई त्यांना उत्तरदायी असतील. तसेच नॉमिनीला दिलेले पैसे हे चुकीच्या व्यवहाराचा भ1ाग ठरतील. अशा चुकीच्या पद्धतीने भरलेले पैसे परत मिळवणे सोपे नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज