अ‍ॅपशहर

Infosysची दिवाळी भेट; प्रति शेअर बंपर लाभांश जाहीर, बायबॅक देखील मंजूर

Infosys Q2 Results: देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत उत्पन्न ३६,५३८ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २९,६०२ कोटी रुपये होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2022, 9:20 am
मुंबई : भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने सप्टेंबर तिमाहीचे निकाल (Infosys Q2 Result) जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा ११ टक्क्यांनी वाढून ६,०२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षी ५,४२१ कोटी रुपये होता. कंपनीने शेअर बायबॅकचीही (Share Buyback) घोषणा केली आहे. हा शेअर बायबॅक ९३०० कोटी रुपयांचा असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Infosys Q2 Result, Dividend and Share buyback


IDFCचे शेअर्स सुसाट! ५२ आठवड्यांतील हाय लेव्हलला पोहोचले शेअर्स, तुमच्याकडे आहेत का?
कंपनीच्या उत्पन्नात वाढ
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना दिवाळी भेट दिली असून १६.५० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने सांगितले की जुलै ते सप्टेंबर या कालावधीत उत्पन्न ३६,५३८ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २९,६०२ कोटी रुपये होते.

IT कंपनी लवकरच देणार लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल; रेकॉर्ड डेट काय, चेक करा डिटेल्स
बायबॅकला मान्यता
इन्फोसिसने ९,३०० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकलाही मान्यता दिली आहे. गुरूवारी इन्फोसिसचा शेअर अर्ध्या टक्क्यांनी कमी होऊन १४२२ रुपयांवर बंद झाला. कंपनी १८५० रुपये प्रति शेअरने बायबॅक करेल. कंपनीने या तिमाहीत १० हजारांहून अधिक नवीन फ्रेशर्सची नियुक्ती केली.

जबरदस्त! चर्चेत नसलेल्या शेअरची मोठी कमाल; एका ऑर्डरनं गुंतवणूकदार मालामाल; दिवसभरात २०% वाढ
सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दरात घट झाली आहे आणि मागील तिमाहीतील २८.४ टक्क्यांवरून २७.१ टक्क्यांपर्यंत नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

महत्वाचे लेख