अ‍ॅपशहर

गुंतवणूकदारांना मंदीतही संधी! टायर कंपनीच्या शेअरने पकडला रॉकेट स्पीड, ५ महिन्यात किंमत दुप्पट

Share Market Update, JK Tyre Share Price: कंपनीचे बाजार भांडवल (एम-कॅप) ४,७७१.९५ कोटी रुपये होते. तर मागील पाच सत्रांच्या तुलनेत समभागाने १४.२३ टक्क्यांनी झेप घेतली आहे. वर्षभराच्या (YTD) आधारावर कंपनीचा शेअर ३८.९६ टक्क्यांनी वाढला असून यापूर्वी जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स सोमवारी झपाट्याने वाढून त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १९७.५० रुपयांवर पोहोचाले.

Edited byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2022, 3:21 pm
मुंबई: टायर बनवणारी दिग्गज कंपनी जेके टायर अँड इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तर मंगळवारी कंपनीच्या समभागांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. जेके टायरच्‍या शेअरच्‍या किमतीत गेल्या ५ महिन्‍यांमध्‍ये दुपटीने वाढ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Share Market Today


अदानींचा NDTV च्या मंडळात प्रवेश, शेअर्सने पकडला रॉकेट स्पीड; एका बातमीने समभागात तुफान उसळी
मंगळवारी कंपनीच्या शेअर्सने बीएसईवर ५ टक्क्यांच्या उसळीसह २०३.९५ रुपयांची पातळी गाठली. गेल्या दोन दिवसांत जेके टायरच्या शेअरची किंमत १८ टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी कंपनीत गुंतवणूक केली असेल, त्याचा परतावा तब्बल ५० टक्क्यांनी वाढला असेल. यापूर्वी जून २०२२ मध्ये, जेके टायरच्या शेअरची किंमत ५२ आठवड्यांच्या नीचांकी ९६.४० रुपयांवर आली होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, आज कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह १९६.७० रुपयांवर व्यवहार करत होते.

US फेडरल रिझर्व्हच्या संकेतांनी बाजारात भरभराट; सेन्सेक्स आणि निफ्टीची पुन्हा ऐतिहासिक भरारी
दरम्यान, या क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांनुसार कंपनीच्या शेअर्सच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तेजीचा फायदा टायर उद्योगालाही होणार आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनात तेजी दिसू शकते, असे तज्ञांचे मत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने टायर उद्योगालाही फायदा होणार आहे.

जबरदस्त कमाईची संधी! टाटा समूहाचा हा शेअर ५२१ रुपयांवर जाण्याची शक्यता, पाहा गुंतवणूकदारांनी काय करावं
जेके टायर, डॉ. ए पी सिंघानिया यांच्या नेतृत्वाखालील जेके ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या टायर उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय जेके टायरचा जगातील २५ सर्वात मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांच्या यादीत समावेशही आहे. कंपनीकडे उत्पादनांची विविधता असून कंपनी ट्रक, बस, ट्रॅक्टर, कार, मोटारसायकलसाठी टायर बनवते.

दुसरीकडे, सोमवारी कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. सोमवारी, जेके टायरचे शेअर्स बीएसईवर १२.१२ टक्क्यांनी वाढून १९३.८० रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किमती १४.२३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, जेके टायरच्या शेअर्समध्ये यावर्षी ३८.९६ टक्के वाढ झाली असून कंपनीचे मार्केट कॅप ४,७७१.९५ कोटी रुपये आहे.
लेखकाबद्दल
प्रियांका वर्तक
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज