अ‍ॅपशहर

शेअरधारकांचे पैसे डबल! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, शेअर्सने ६ महिन्यांत दिलाय मजबूत परतावा

Dividend Date: संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत २१४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्यापेक्षा हा आकडा ५८ टक्के अधिक आहे. कंपनीचे उत्पन्नही ८ टक्क्यांनी वाढून १,७०२ कोटी रुपये झाले आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2022, 11:33 am
मुंबई: संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सने (Mazagon Dock Shipbuilders) लाभांश जाहीर केला आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२३ साठी शेअरधारकांना प्रति शेअर ९ रुपये लाभांश देणार आहे. कंपनीच्या शेअरधारकांसाठी ही दुहेरी भेट असेल, कारण या शेअर्सने अवघ्या ६ महिन्यांत जवळपास २०० टक्के परतावा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mazogon Dock Dividend Date


भागधारकांना ९१ टक्के लाभांश मिळेल
एक्सचेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की संचालक मंडळाने १० नोव्हेंबर रोजी प्रति शेअर ९.१० रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. यासाठी २२ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

LIC चा शेअर घेणं फायद्याचं की तोट्याचं? वाचा काय आहे ब्रेकरेजचा सल्ला
माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders)
  • प्रति शेअर लाभांश रु ९.१०
  • रेकॉर्ड डेट २२ नोव्हेंबर
  • एक्स तारीख २१ नोव्हेंबर

गुंतवणूकदारांना 'अच्छे दिन'! एका शेअरवर ९ बोनस शेअर्स, मल्टीबॅगर स्टॉक आता स्प्लिट होणार
रेकॉर्ड आणि एक्स डिव्हिडंट तारीख म्हणजे काय ?
कोणत्याही शेअर्सची रेकॉर्ड डेट म्हणजे गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स या तारखेपूर्वी असणे आवश्यक आहे. यामुळे लाभांश मिळण्यास पात्र असलेल्या गुंतवणूकदारांची ओळख पटवणे सोपे होते. याशिवाय, एक्स-डिव्हिडंड तारीख ही कोणत्याही गुंतवणूकदारासाठी शेअर्स खरेदी करण्याची शेवटची तारीख असते. गुंतवणूकदारांनी एक्स-डिव्हिडंड तारखेनंतर शेअर्स खरेदी केल्यास त्यांना लाभांशाचा लाभ मिळत नाही.

बोनस शेअरची जादू, गुंतवणूकदारांचा खिसा भरला; ५२ आठवड्यांच्या नीचांकीवरून स्टॉक तेजीत
सप्टेंबर तिमाहीचे मजबूत निकाल
संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत २१४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्यापेक्षा हा आकडा ५८ टक्के अधिक आहे. कंपनीचे उत्पन्नही ८ टक्क्यांनी वाढून १,७०२ कोटी रुपये झाले आहे. माझॅगॉन डॉक भारतीय नौदल आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांची दुरुस्ती आणि बांधकाम करते. २००६ मध्ये कंपनीला मिनीरत्न दर्जा देण्यात आला.

माझगाव डॉक स्टॉक कामगिरी
ऑक्टोबर २०२० मध्ये माझगाव डॉकचा शेअर बाजारात प्रवेश झाला.. IPO ची इश्यू किंमत १४५ रुपये होती, जी ११ नोव्हेंबर २०२२ला ७९१.८० रुपयांवर बंद झाली. सूचीबद्ध झाल्यापासून भागधारकांना ३७० टक्के मजबूत परतावा मिळाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज