म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील चौगुले उद्योग समूहाचे प्रमुख लक्ष्मण उर्फ दादासाहेब चौगुले (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास निधन झाले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटी आणि केआयटी कॉलेजच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यावर येथील पंचगंगा स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चौगुले उद्योग समूहातील कर्मचारी, जिल्ह्यातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाविसर्जन रविवारी (१७ जून) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.
मूळचे पन्हाळा तालुक्यातील माजगावचे रहिवासी असलेले लक्ष्मण चौगुले दादासाहेब म्हणूनच परिचित होते. बीए आणि बीकॉमचे शिक्षण घेतलेल्या दादासाहेबांनी १९६६ मध्ये उद्यमनगरात भाड्याच्या जागेत उद्योग सुरू केला. भारत उद्योग केंद्र नावाने एका लेथ मशीनवर सुरू केलेल्या या उद्योगाचा आज वटवृक्ष झाला आहे.
भारत उद्योग, चौगुले इंडस्ट्रिज्, एल. बी. एंटरप्रायजेस आणि चौगुले मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी चौगुले समूहाचा विस्तार केला.