अ‍ॅपशहर

एनआयओएसतर्फे दहावीसाठी प्रवेश

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था येथे स्ट्रिम-२ अंतर्गत १० वी आणि १२ वीसाठी ऑनलाइन प्रवेश सुरू करण्यात आले आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी राष्ट्रीय मुक्त विद्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2018, 11:56 am
कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nios


भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था येथे स्ट्रिम-२ अंतर्गत १० वी आणि १२ वीसाठी ऑनलाइन प्रवेश सुरू करण्यात आले आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी राष्ट्रीय मुक्त विद्यालयातर्फे देण्यात आली आहे. १६ जुलैपर्यंत अर्जासाठी मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेतर्फे दहावी आणि बारावीसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. जे विद्यार्थी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांना पात्र ठरून अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा परीक्षा देण्यास पात्र असूनही परीक्षेस बसले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षण मंडळाची मूळ अनुत्तीर्ण मार्कशीट किंवा प्रवेश पत्राच्या आधारे राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेस बसता येणार आहे. प्रवेशासंबंधी सर्व माहिती राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या www.nios.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरतेवेळी आपली सर्व माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज