अ‍ॅपशहर

JEE Main, NEET चा सिलॅबसही होणार कमी?

वर्ष २०२०-२१ साठी जेईई मेन आणि नीट परीक्षांचा अभ्यासक्रमदेखील कमी व्हावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2020, 1:22 pm
JEE Main, NEET syllabus: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने शैक्षणिक सत्र २०२० - २१ साठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा सिलॅबस कमी करण्यात आला आहे. कोविड - १९ महामारीमुळे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास होणाऱ्या विलंबामुळे हा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. सीबीएसईच्या या निर्णयानंतर आता मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांबाबत (NEET आणि JEE Main) देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after cbse demand for neet and jee main syllabus reduction
JEE Main, NEET चा सिलॅबसही होणार कमी?


नीट आणि जेईई मेनमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमातून विचारले जातात. अशात जर देशातील सर्वात मोठं बोर्ड असलेल्या सीबीएसईने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तर साहजिक आहे त्याचा परिणाम नीट आणि जेईई मेनवर देखील होणार आहे.

यासाठी आता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कोचिंग क्लासेसना देखील अशी अपेक्षा आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी देखील नीट आणि जेईई मेनच्या अभ्यासक्रमासंबंधी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेईल. सोशल मीडियावर देखील ही मागणी जोर धरत आहे.

CBSE ने अभ्यासक्रमातून वगळले 'हे' विषय

विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

मंगळवारी रात्री ट्विटरसह काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नीट आणि जेईई मेनचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी केली जात आहे.

NTA च्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

CBSE च्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज