अ‍ॅपशहर

AICTE चे सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठांसाठी ६ जुलै रोजी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली. या आधारे एआयसीटीईनेदेखील सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2020, 2:41 pm
AICTE revised calendar: विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षांसंदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केल्यानंतर त्या आधारे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेनेदेखील सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केलं आहे. या वेळापत्रकाच्या आधारेच देशातील विविध तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, परीक्षा आणि वर्गांना सुरूवात होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aicte issued revised academic calendar 2020 for admissions new semester timetable of technical institutes
AICTE चे सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी


एआयसीटीईने आपली अधिकृत वेबसाईट aicte-india.org वर हे सुधारित कॅलेंडर जारी केलं आहे. यासोबतच एक नोटीसीह AICTE ने जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 'करोना व्हायरस महामारीमुळे राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. अशात विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी यूजीसीने दिशानिर्देश जारी केले आहेत. आता यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे एआयसीटीईने तंत्र शिक्षण संस्थांसाठी आपलं शैक्षणिक कॅलेंडर जारी केलं आहे.'

करोना महामारीमुळे बदलत असणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालय आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे या कॅलेंडरमध्ये यापुढेही बदल होण्याची शक्यता आहे, असंही एआयसीटीईने या सूचनेत म्हटलं आहे.

विद्यापीठ परीक्षांसाठी UGC चे SOP जारी

CBSE बोर्डाने ९वी ते १२ वीचा अभ्यासक्रम केला कमी



ज्या संस्थांनी AICTE द्वारे आधी जारी केलेल्या कॅलेंडरच्या आधारे वर्ग सुरू केले असतील, ते एकतर ते वर्ग स्थगित करू शकतात किंवा अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन + ऑनलाइन मोडवर विशेष वर्ग भरवू शकतात.

AICTE revised calendar 2020 साठी येथे क्लिक करा.

AICTE च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज