अ‍ॅपशहर

संचारबंदीमुळे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

संचारबंदीमुळे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अमरावती, अचलपूरसह पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांत प्रशासनाने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाला नियोजित परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे कळवण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2021, 7:00 am
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अमरावती महसूल विभागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या पत्रव्यवहारानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati university exams postponed due to night curfew
संचारबंदीमुळे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित


परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी सोमवार, २२ फेब्रुवारी रोजी हे आदेश काढल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ फेब्रुवारीपासून होणार होत्या. तसे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. परंतु अमरावती, अचलपूरसह पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांत प्रशासनाने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाला नियोजित परीक्षा घेणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याबाबतची चर्चा तातडीने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हिवाळी २०२० सत्राच्या या परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

पुण्यात शाळा बंदकरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व माध्यमांच्या सर्व शाळा, तसेच महाविद्यालये ही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल आणि बार रात्री ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नसून, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.


विद्यार्थी कोविड-१९ पॉझिटिव्ह; नागपूरमधील आठ शाळा बंद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज