अ‍ॅपशहर

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या ओपन बुक टेस्ट लांबणीवर

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने ओपन बुक परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2020, 5:08 pm
AMU Exams 2020: अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या सर्व अंतिम सत्र परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने शुक्रवारी ३ जुलै रोजी ही घोषणा केली. AMU ने जाहीर केलं की कोविड - १९ संक्रमण स्थिती आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या पार्श्वभूमीवर सर्व एंड सेमिस्टर परीक्षा स्थगित केल्या जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amu aligarh muslim university postpones open book exams
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या ओपन बुक टेस्ट लांबणीवर


अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने यासंदर्भात जारी केलेल्या नोटिफिकेशनमद्ये म्हटलं आहे की, 'जुलै मध्ये होणाऱ्या २०१९-२० या वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा (बॅकलॉग / शिल्लक पेपर्ससह) पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.' या प्रकरणी केंद्र सरकार किंवा यूजीसीद्वारे अधिसूचित दिशानिर्देश जारी झाल्यानंतरच आता पुढील निर्णय घेण्यात येईल.

दिल्ली युनिव्हर्सिटीनंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने सर्व पदवीपूर्व, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या फायनल इयर विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मागील सेमिस्टर किंवा वर्षाच्या बॅकलॉगसाठीदेखील परीक्षा अशाच प्रकारे आयोजित करण्याची घोषणा केली होती. रजिस्ट्राल अब्दुल हामिद आणि परीक्षा नियंत्रक मुजीब उल्लाह जुबेरी यांनी नोटिफिकेशन जारी करत ही माहिती दिली होती.

शिक्षकांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या पुढील सूचना आल्या..जाणून घ्या

JEE Main, NEET परीक्षा दोन महिने पुढे ढकलल्या

देशभरात पसरलेला कोविड -१९ विषाणू आणि त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ध्यानात घेऊन ओपन बुक टेस्ट आयोजित करण्याच निर्णय घेतला होता. विशेषत: जे अन्य राज्य वा केंद्रशासित प्रदेशातून येतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खूपच दिलासादायक होता. मात्र करोनाची स्थिती सामान्य न झाल्याने हा निर्णय घेतला.

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात यंदा २५ टक्के कपात

दरम्यान, दिल्ली विद्यापीठाने यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ओपन बुक परीक्षेचे टाइमटेबल जारी केले आहे. विद्यापीठाच्या du.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. या परीक्षा १ जुलैपासून सुरू होणार होत्या. मात्र विद्यापीठाने त्या दहा दिवस पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा आता १ जुलै ऐवजी १० जुलै पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकासह डीयूने ऑनलाइन ओपन बुक परीक्षा 'मॉक टेस्ट' सीरीजचे शेड्युल देखील जारी केले आहे. या मॉक टेस्ट ४ जुलै पासून सुरू झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज