अ‍ॅपशहर

मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीत बदल

तंत्रज्ञानात होत असलेल्या अफाट बदलांचा परिणाम मनुष्यबळ विभागावरही होत असून बहुतांश कंपन्यांच्या मनुष्यबळासंबंधी कार्यपद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत, असे निरीक्षण आयबीएमचे उपाध्यक्ष व मनुष्यबळ विभागाचे प्रमुख डी. पी. सिंग यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 18 Nov 2017, 1:24 am
टाइम्स न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bennett university mba noida
मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीत बदल


ग्रेटर नोएडा : तंत्रज्ञानात होत असलेल्या अफाट बदलांचा परिणाम मनुष्यबळ विभागावरही होत असून बहुतांश कंपन्यांच्या मनुष्यबळासंबंधी कार्यपद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत, असे निरीक्षण आयबीएमचे उपाध्यक्ष व मनुष्यबळ विभागाचे प्रमुख डी. पी. सिंग यांनी व्यक्त केले. येथील बेनेट विद्यापीठात एमबीए (मनुष्यबळ) अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.

मनुष्यबळात एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सतत शिकण्याची वृत्ती जोपासण्याची गरज आहे असे सांगत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्यात होणारे बदल टिपत राहाणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला ज्या प्रकारच्या कंपनीत काम करायचे आहे, त्यांच्या उद्योग-व्यवसायाविषयीची पूर्ण माहिती करून घ्या व त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांवरही बारीक लक्ष ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारतातील अनेक प्रस्थापित कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत तसेच मनुष्यबळासंबंधी कार्यप्रणालीत बदल केले आहेत. हे बदल प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानामुळे झाले आहेत. तंत्रज्ञानामुळे नवनवीन बिझनेस मॉडेल अस्तित्वात येत आहेत. उद्योगजगतातील स्पर्धेवरही तंत्रज्ञानाचा परिणाम होत आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या डिजिटल युगामध्ये सर्वांना संधी मिळत आहे. परंतु त्याबरोबरच आव्हानांनाही तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी

तुम्हाला कौशल्य दाखवावे लागेल. कल्पकता व वेगळ्या दृष्टिकोनाद्वारे तुमच्या संस्थेला कसा लाभ होईल हे पहावे लागेल. संस्थेला गुणी कर्मचारी मिळावेत यासाठी तुम्हाला डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड आदी आधुनिक माध्यमांचा वापर करावा लागेल, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज