अ‍ॅपशहर

ईसीजी टेक्निशिअन व्हा; नोकरीच्या भरपूर संधी

ईसीजी टेक्निशिअन म्हणून करिअर करण्याचे अनेक फायदे आहेत. रुग्णालये, क्लिनिक्स आणि प्रयोगशाळेत नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यासाठी कोणता कोर्स असतो, वेतन किती मिळतं... जाणून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 12:24 pm
ईसीजी टेक्निशिअनला कार्डिओग्राफिक टेक्निशिअनही म्हटलं जातं. ईसीजी मशीनचा वापर करून रुग्णाचा हार्ट रेट मोजणं, कार्डिअॅक रिदम मॉनिटर करणार, दिल आणि आर्टरीज (रक्तवाहिन्या) मधील अनियमितता शोधण्यासाठी डॉक्टरांना मदत करणं, डेटा एकत्रित करणं, रुग्णाच्या तब्येतीतील चढउतारांवर लक्ष ठेवणं, हृदयरोगतज्ज्ञांची मदत करणं आदी कामं ईजीसी टेक्निशिअन करतात. यात करिअर करण्याचे अनेक फायदे आहेत. रुग्णालये, क्लिनिक्स आणि प्रयोगशाळेत नोकरीच्या भरपूर संधी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ecg


अभ्यासक्रम आणि पात्रता


कोर्सच्या दरम्यान विद्यार्थ्यांना वर्षातून दोन सत्रे पूर्ण करावयाची असतात. यात त्यांनी थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही शिकवलं जातं. या अभ्यासक्रमात हृदय आणि छातीची शरीर रचना विज्ञान आणि शरीर क्रिया विज्ञानवर महत्त्वपूर्ण अभ्यास कव्हर केला जातो. हृदय कसं काम करतं आणि ईसीजी कसं काम करतं ते या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. डिप्लोमा इन इलेक्ट्रोकार्डिओग्राम टेक्नॉलॉजी कोर्स असं या डिप्लोमाचं नाव आहे.

संधी

डिप्लोमा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयामध्ये, लॅबमध्ये नोकरीची संधी असते. आपत्कालीन स्थितीमध्येही सर्वाधिक गरज वैद्यकीय सहयोगी कर्मचाऱ्याची असते. तेव्हाही या टेक्निशिअनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.

वेतन

या क्षेत्रात करिअरची सुरुवात करताना तुम्लाहा कमीत कमी २० हजार रुपये महिना कमावता येतात. अनुभवाच्या आधारे वेतन वाढत जाते.

विविध विद्यापीठांमध्ये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज