अ‍ॅपशहर

CBSE Exam 2021: सीबीएसई बारावी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 12:36 pm
CBSE Board class 12th practical exam 2021: कोविड - १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळांचे शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू झाले. बहुतांश शाळा आता बंद आहेत आणि वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये उर्वरित ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील विद्यार्थी-शिक्षकांसाठी कठीण जात आहे. याच दरम्यान बोर्डाने २०२१ मधील बोर्ड परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbse class 12th practical exam 2021 provisional date released
CBSE Exam 2021: सीबीएसई बारावी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर


काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. परीक्षा निश्चितपणे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता सीबीएसईमार्फत बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरही (SOP) देखील तयार करण्यात आले आहे.

बोर्डाने सांगितलं आहे की बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. मात्र तारखांवर अद्याप अंतिम निर्णय होणं शिल्लक आहे. यानंतर प्रॅक्टिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रकाचे अंतिम नोटिफिकेशन जारी केले जाईल.

कशा होणार प्रॅक्टिकल परीक्षा?

बोर्डाने यासंबंधातील एसओपी तयार केले आहे. यानुसार, शाळांना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी बोर्डाद्वारे विविध तारखा पाठवण्यात येतील. त्या तारखांमध्ये शाळांनी या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. बोर्डाकडून एक पर्यवेक्षक शाळांमध्ये परीक्षांच्या वेळी उपस्थित असेल.

करोनामुळे रद्द होणार का कॅट परीक्षा? निमंत्रकांनी दिली माहिती

दरम्यान, २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या तर परीक्षा नियोजित वेळेतच होतील, असे बोर्डाने सांगितले आहे.

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज