अ‍ॅपशहर

सीबीएसई बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी? बोर्डाने दिली माहिती

सीबीएसई बोर्डाचा बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी... जाणून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 5:52 pm
CBSE Compartment Exams Result Date 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने २४ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbse compartment exam result 2020 board informs about result date to supreme court
सीबीएसई बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी? बोर्डाने दिली माहिती


सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई कंपार्टमेंट निकाल आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक कॅलेंडर २०२०-२१ संबंधी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणामुळे परिस्थिती सामान्य नाही. सीबीएसईच्या कंपार्टमेंट परीक्षाही यामुळे विलंबाने सुरू झाल्या. परिणामी निकालाला विलंब होईल. अशातच यूजीसीच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार जर विद्यापीठांमधील प्रथम वर्ष प्रवेश बंद झाले, तर सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल, अशी भीती या याचिकेच व्यक्त करण्यात आली आहे.

न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. खंडपीठाने सीबीएसईला सांगितले होते की फेरपरीक्षांच्या निकालाचा निश्चित कालावधी सांगा, जेणेकरून यूजीसीला त्याअनुसार निर्णय घेता येईल.

ICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर

याच्या उत्तरादाखल सीबीएसईने सांगितले की बारावीच्या फेरपरीक्षेच्या म्हणजेच कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालाची घोषणा १० ऑक्टोबर २०२० किंवा त्यापूर्वी केली जाईल. दुसरीकडे, यूजीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार, प्रथम वर्ष पदवी प्रवेशांची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० आहे.

अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघरमधील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज