अ‍ॅपशहर

दिल्ली हिंसाचार: दंगलग्रस्त भागातील २८, २९ मार्चचे पेपरही रद्द

दिल्लीच्या विविध भागात सीएएवरून हिंसक आंदोलन सुरू आहे. गेल्या रविवारपासून या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. शुक्रवार २८ आणि शनिवार २९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भागातल्या परीक्षा केंद्रांवरीलही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दंगलग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडली असेल त्यांनी ताण घेऊ नये, निश्चिंत रहावे, असे आवाहन सीबीएससी बोर्डाने केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2020, 5:12 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbse-delhi

दिल्लीच्या विविध भागात सीएएवरून हिंसक आंदोलन सुरू आहे. गेल्या रविवारपासून या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य भागातील या अशांततेमुळे सीबीएसई बोर्डाने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार २८ आणि शनिवार २९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भागातल्या परीक्षा केंद्रांवरीलही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दंगलग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडली असेल त्यांनी ताण घेऊ नये, निश्चिंत रहावे, असे आवाहन सीबीएससी बोर्डाने केले आहे.

गुरुवारी सीबीएसई बोर्डाने परिपत्रक काढून २८ आणि २९ च्या ईशान्य दिल्लीतील केंद्रांवरील परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली. अन्य सर्व केंद्रांवरील परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहेत. ईशान्य भागातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हुकल्या आहेत, त्यांना परीक्षेची पुढील तारीख कळवण्यात येणार आहे.

कोणकोणत्या परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द केल्या आहेत, याची माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ईशान्य दिल्लीतल्या शाळांमधील पुढील विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत -


दिल्ली: सीबीएसई बारावीचा इंग्रजी पेपरही रद्द

राज्यातले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त

परीक्षेचा ताण: मुलांना द्या 'हे' पदार्थ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज