अ‍ॅपशहर

CBSE आणि फेसबुक देणार डिजीटल सेफ्टीचे धडे

CBSE आणि फेसबुक मिळून विद्यार्थ्यांना डिजीटल सुरक्षिततेचे धडे देणार आहेत. कधीपासून नोंदणी वाचा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2020, 8:41 pm
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्ड आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डिजीटल सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणार आहे. यासाठी बोर्डाने फेसबुकसोबत करार केला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन संभाव्य धोक्यांपासून बचाव करता यावा हे या प्रशिक्षणामागचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cbse facebook to offer free courses for teachers and students
CBSE आणि फेसबुक देणार डिजीटल सेफ्टीचे धडे


करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे प्रत्यक्ष शाळेतलं शिक्षण गेले चार महिने थांबलेले आहे. आता केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइनमुळे शिक्षणात खंड पडला नसला तरी ते घेताना विद्यार्थ्यांना आणि देताना शिक्षकांना काही गोष्टींपासून स्वत:चा बचावही करणे गरजेचे आहे. ऑनलाइन छेडछाड, फेक न्यूज, फसव्या सूचना, इंटरनेटच्या वापराचं व्यसन अशा गोष्टींचं प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने फेसबुकसोबत करार केला आहे. यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजीटल सेफ्टीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण व्हर्च्युअर मोडने होणार आहे.

या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना फेसबुक आणि सीबीएसई प्रमाणपत्रही देणार आहे. दोन्ही संस्थांकडून संयुक्त स्वरुपात हे प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रशिक्षण तीन आठवड्यांचं असेल. दहा हजार शिक्षकांना इंटरनेटवर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. सोबतच दहा हजार विद्यार्थ्यांना डिजीटल सेफ्टीचे धडे दिले जाणार आहेत.



शिक्षकांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या पुढील सूचना आल्या..जाणून घ्या

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात यंदा २५ टक्के कपात

६ जुलैपासून २० जुलैपर्यंत नोंदणी


डिजीटल सेफ्टी कॅटेगरीअंतर्गत विद्यार्थ्यांना इन्स्टाग्राम टूलकिटसंबंधी प्रशिक्षित केले जाईल. यासाठीची नोंदणी प्रक्रिया ६ जुलै ते २० जुलै या कालावधीत होणार आहे. शिक्षकांचं प्रशिक्षण कार्यक्रम १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज