अ‍ॅपशहर

CBSE: काय आहे सायबर सेफ्टी हँडबुक?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 8:15 pm
कोविड - १९ महामारीचं संक्रमण रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या काळात सर्व शाळा महाविद्यालयांचे विदयार्थी घरी बसलेले आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन साधनांचा वापर केला जात आहे. मात्र या परिस्थितीमुळे सायबर सिक्युरिटी हाही चिंतेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सीबीएसई


विद्यार्थ्यांना ऑनलाइन धोक्यांपासून सावध करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ने अलीकडेच सायबर पीस फाउंडेशनसह सायबर सेफ्टी हँडबुक लाँच केले आहे.

जगभरात करोनाचं संकट आ वासून उभं राहिलं आहे. पण त्याआधीच मे २०१९ मध्ये हे हँडबुक तयार करण्यासंबंधीची चर्चा सुरू झाली होती. या हँडबुकमध्ये ९८ पाने आहेत. यात ऑनलाइन धमकी, भावनिक छळ, ऑनलाइन शोषण, सायबर सुरक्षा, सायबर धोके आदि विविध विषयांसंबंधी माहिती आहे.

कॉलेज परीक्षांबाबत केंद्रीय मंत्र्यांची वेबिनारमध्ये माहिती

CBSE विद्यार्थ्यांना दिलासा; घराच्या जिल्ह्यातच केंद्र

सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले की हे हँडबुक बोर्डाशी संलग्न सुमारे २२ हजार शाळांना पाठवण्यात आलं आहे. या शाळांच्या माध्यमातून ही हस्तपुस्तिका २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे.

या हँडबुकमध्ये विद्यार्थ्यांना डिजीटल नागरिकत्वाचे नऊ महत्त्वाचे अविभाज्य भाग असलेल्या डिजीटल रिच, साक्षरता, दळणवळण, शिष्टाचार, आरोग्य-कल्याण, अधिकार, स्वातंत्र्य आणि जबाबदारी, सुरक्षा आणि कायदा या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज