अ‍ॅपशहर

CTET: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2020, 8:11 pm
CTET Postponed: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डातर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा ५ जुलै २०२० रोजी होणार होती. परीक्षेची नवी तारीख कोविड - १९ संक्रमण स्थिती सामान्य झाल्यावर जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ctet july 2020 central teachers eligibitilty test postponed due to corona pandemic
CTET: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर


सेंट्रल टीचर्स एलिजीबिलीटी टेस्ट (CTET) बद्दल उमेदवारांना कोणतीही अद्ययावत माहिती हवी असेल तर त्यांनी www.ctet.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असं सीबीएसईने जाहीर निवेदनात म्हटलं आहे. सीबीएसईचे सचिव आणि सीटीईटीचे संचालक अनुराग त्रिपाठी यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन जारी करण्यात आलं आहे.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.



सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द

सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द

करोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सीबीएसईने दहावी, बारावीच्या उर्वरित प्रलंबित परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला कळवला. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांचा निकाल आधीच्या विषयांच्या परीक्षेत अंतर्गत कामगिरीवर आधारित असेल, तर इयत्ता बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन श्रेणी सुधारायची असेल तर परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा देऊन श्रेणीसुधारचा पर्याय देण्यात येईल. जे परीक्षा देणार नाहीत त्यांना शाळेत घेण्यात आलेल्या शेवटच्या तीन परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे गुण देण्यात येतील.

आयसीएई बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

करोना व्हायरसची संक्रमण स्थिती गंभीर

देशात करोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आणि परिस्थिती गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता सीबीएसई आणि आयसीएसईने बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. नीट आणि जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही होत आहे. जेईई मेन २०२० ची परीक्षा १८ ते २३ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे, तर एनईईटी परीक्षा २६ जुलै रोजी आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज