अ‍ॅपशहर

दिल्लीच्या शाळांमध्ये 'रिमोट लर्निंग प्लानिंग'

दिल्लीच्या शाळांमध्ये रिमोट लर्निंग प्लानची सुरुवात होत आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2020, 6:39 pm
Delhi remote learning plan: दिल्लीतील केजी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या सोमवारी ६ जुलै पासून रिमोट लर्निंग प्लानची सुरुवात होत आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी या योजनेची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi schools remote learning plan for class kg to 12 launched by manish sisodia
दिल्लीच्या शाळांमध्ये 'रिमोट लर्निंग प्लानिंग'


दिल्लीत ३१ जुलैपर्यंत शाळा बंद आहेत. अशात या देशाच्या राजधानीतील सरकारी आणि अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नुकसान कमी करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. हा वैकल्पिक प्लान आहे. मनीष सिसोदिया ही योजना लाँच करताना म्हणाले, 'शाळा बंद आहेत. पण शिक्षण सुरू राहायला हवं. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची संधी डिजीटल डिव्हाइडमुळे गमावता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'

काय आहे रिमोट लर्निंग प्लान?

केजी ते १२ वी पर्यंतचे वर्ग तीन भागात विभागण्यात आले आहेत. यासाठी तीन वेगवेगळ्या रणनीती आखण्यात आल्या आहेत, ज्या डिजीटल डिव्हाइसेस, टीचर्स, पालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या मदतीने पूर्ण केल्या जाणार आहेत.

केजी ते आठवीपर्यंत : पाठ्यक्रमाच्या आधारे कंटेंट आणि प्रश्नांच्या दैनंदिन वर्कशीट्स विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत पाठवण्यात येतील. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, आकलन, मुलभूत गणित आणि आनंद निर्माण व्हावा, अशा पद्धतीने या वर्कशीट तयार करण्यात येतील.

इयत्ता नववी आणि दहावी: विषयांशी संबंधित वर्कशीट्स, कंटेंट विद्यार्थ्यांना पाठवले जातील. जेणेकरून विद्यार्थी विषयाचं मुलभूत आकलन करू शकतील.

ICSE दहावी, बारावी उर्वरित परीक्षांची मूल्यांकन पद्धती जाहीर

इयत्ता ११ वी आणि १२ वी: टॉप १२ विषयांचे दररोज दोन तास ऑनलाइन वर्ग घेण्यात येतील. यात बेसिक टॉपिक शिकवण्यापासून वर्गांना सुरुवात होईल. एक वर्ग ४५ मिनिटे चालेल. एका दिवशी दोन वर्ग घेतले जातील. अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि अकरावीच्या रिअॅडमिशननंतर सुरू होतील.

पहिली ते पाचवीसाठी NCERT चं नवं कॅलेंडर

ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही त्यांच्यासाठी...

सर्व शाळाप्रमुखांनी हे सुनिश्चित करायचे आहे की प्रत्येक क्लासटीचरकडे विद्यार्थ्यांचा अपडेटेड व्हॉट्सअप ग्रुप असेल. टीचर्सना त्या पालकांची देखील यादी तयार करायची आहे, ज्यांच्याकडे व्हॉट्स अप नाही. ज्या पालकांकडे व्हॉट्स अॅप नाही त्यांना क्लासटीचर्सद्वारे फोन कॉलच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट दिले जाईल. त्यांनी शाळेत आठवड्यातून एकदा जाऊन लर्निंग मटेरिअल घ्यायचे आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ पालकांना शाळेत बोलावले जाईल. अशा प्रकारे वर्कशीट पूर्ण करून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांद्वारेच टीचर्सपर्यंत पोहोचवायचे आहे.

दिल्ली विद्यापीठ ओपन बुक टेस्टचं वेळापत्रक जारी

या व्यतिरिक्त देखील वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन टीचिंग-लर्निंग अॅक्टिव्हिटिज सुरू राहतील. शिक्षण संचालनालय यावर देखरेख ठेवणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज