अ‍ॅपशहर

१० वी, १२ वी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची बोर्ड फी परत करण्याची मागणी

करोना महामारी संक्रमणामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2021, 4:01 pm
मुंबई: दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या असल्याने एसएससी बोर्डाने विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेचे शुल्क सरासरी ४२५ रुपये तर बारावी परीक्षेचे शुल्क सरासरी ६०० रुपये आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand of bjp teachers aghadi to reimburse exam fees of ssc hsc students
१० वी, १२ वी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची बोर्ड फी परत करण्याची मागणी


१० वीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे सराव चाचणी, स्वाध्याय, प्रकल्प, गृहकार्य, तोंडी परीक्षा यासारखे तंत्र वापरून करावयाचे आहे. शिक्षण मंडळाचा विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, भरारी पथकाचा खर्च, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरील खर्च वाचला आहे. यासोबतच लेखी परीक्षाच रद्द झाल्याने परीक्षक, नियामक व मुख्य नियामक यांना देण्यात येणारा मानधनरुपी खर्चही मंडळाचा वाचला आहे.

राज्यात दहावीला यंदा १६ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले असून परीक्षा शुल्कापोटी राज्य शिक्षण मंडळाकडे जवळपास ७० कोटी रुपये जमा झाले आहेत. यातील प्रश्नपत्रिका छपाईचा खर्च वजा करता राहिलेली रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी जेणे करून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ती वापरता येईल, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण मंडळाकडे केली आहे.

खुशखबर! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडागुण मिळणार

सीबीएसई बारावीसाठी मूल्यांकन पद्धत 'या' दिवशी जाहीर होणार

कोविड काळात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार व धंदे बंद पडल्याने राज्यातील जवळपास २ लाख नववी उत्तीर्ण झाले परंतु त्यांनी दहावीचे फार्म भरले नाही त्याची कारणेही शासनाने शोधावी व या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे असेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.

विद्यार्थी लागले अभ्यासाला; २० गुणांच्या अंतर्गत मूल्यामापन प्रक्रियेचे काम सुरू

दहावी परीक्षेचे मूल्यमापन करणे सोपे, हेल्पलाइन नंबर जाहीर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज