अ‍ॅपशहर

शुल्कवसुली सुरूच; पालक करणार ऑनलाइन निदर्शने

शिक्षण संस्था शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत.. अनेकांनी फीवाढही केली आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2020, 7:03 pm
मुंबई: करोनासंबंधी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले असून काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेजांनी शुल्कवाढ करू नये. तसेच पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. असे असले तरीही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहेच. याचबरोबर अनेक संस्थांनी शुल्कवाढही केली आहे. याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शुल्कवसुली


खासगी व स्वायत्त कॉलेजांबरोबरच मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील प्रशासनाकडून पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क तातडीने भरण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे ही सक्ती थांबवण्यात यावी, तसेच कॉलेजांनी शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करू नये, असे आदेश विद्यापीठाने द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, कुलगुरू, तंत्र शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे. युवा सेनेने विविध इंजिनीअरिंग तसेच पारंपरिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या कॉलेजांच्या शुल्कवाढीविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन तंत्रशिक्षण संचालकांनी संबंधित अभियांत्रिकी कॉलेजला शुल्कवाढीबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. करोनाच्या कालावधीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींना पूर्ण पगार मिळत नाही. यामुळे कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कॉलेजांमध्ये नोटीस प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच हे शुल्क तातडीने भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी प्रचंड चिंतेत आहेत.

CTET परीक्षा: मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांसाठी क्लिक करा...

विद्यापीठास आवाहन

विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. याबाबत शुल्क भरण्याची सक्ती टाळण्याबरोबरच छात्रभारतीने कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रामध्ये कॉलेजांनी विद्यार्थ्यांना तात्काळ पैसे भरण्याची सक्ती करू नये, विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नसल्यास त्यांची प्रवेशादरम्यान अडवणूक न करता प्रवेश द्यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क ४ ते ५ टप्प्यांत भरण्याची मुभा द्यावी आणि कुठलेही शुल्क वाढवू नये व शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. तर युवा सेनेनेही याविरोधात आक्रमक पवित्रा घेत शुल्कवाढ करणाऱ्या कॉलेजांविरोधात कारवाई करण्याची मागणी केल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल देवरुखकर शेठ यांनी सांगितले.

MHT-CET: ६० हजार विद्यार्थ्यांनी बदलले परीक्षा केंद्र

शाळांवरही कारवाई व्हावी


अनेक शाळांनीही सरकारचा आदेश धुडकावून शुल्कवाढ केली आहे. त्या शाळांच्या विरोधात काही पालकांनी पोलिस तक्रारही केली. याबाबत उद्या काही पालक ऑनलाइन निदर्शनेही करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज