अ‍ॅपशहर

AMU केवळ ३० टक्के गुणांसाठी घेणार पदवी परीक्षा

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ केवळ ३० टक्के गुणांच्या तोंडी पदवी परीक्षा घेणार आहे....

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2020, 11:48 am
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने सर्व यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. इतकेच नव्हे तर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गदेखील सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम final year exams 2020 amu to conduct online exams of ug pg courses through viva
AMU केवळ ३० टक्के गुणांसाठी घेणार पदवी परीक्षा


AMU च्या परीक्षा viva च्या स्वरुपात होणार आहेत. तसेच केवळ ३० टक्के गुणांच्या असणार आहेत. विद्यापीठातील फॅकल्टी डीन्स, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की AMU ने चालू सत्रासाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ७० टक्के गुणांसाठी मूल्यांकन अन्य पद्धतीने केलं आहे. दुसरीकडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अलीकडेच जारी झालेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना सप्टेंबर अखेरपर्यंत पदवीच्या अंतिम परीक्षांचे आयोजन करायचे आहे.

अंतिम वर्ष परीक्षांचा पॅटर्न बदलला जाऊ शकतो का? हायकोर्टाचा सवाल

पदवी परीक्षा: सर्व याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी


विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी सांगितले होते की देशातील ६०३ विद्यापीठांनी अंतिम पदवी परीक्षा यापूर्वीच घेतल्या आहेत किंवा घेणार आहेत. म्हणजेच २०९ विद्यापीठांच्या पदवी परीक्षा झाल्या आहेत आणि ३९४ विद्यापीठे ऑगस्ट किंवा सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करत आहेत. दरम्यान, पदवी परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या सर्व याचिकांवर सोमवारी २७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज