अ‍ॅपशहर

11th Admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2020, 4:18 pm
FYJC Online Admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी यादी शनिवारी ५ डिसेंबर रोजी जाहीर झाली. ही यादी अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर 11thadmission.org.in वर जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fyjc online admission 2nd merit list 2020 released at 11thadmission org in
11th Admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर


विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेला प्रवेश ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत निश्चित करावायाचा आहे. पुढील पद्धतीने मेरीट लिस्ट डाऊनलोड करता येईल -

FYJC 2nd Merit List 2020 डाऊनलोड कशी करावी?

- अकरावी ऑनलाइनच्या 11thadmission.org.in या संकेतस्थळावर जा.
- मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद किंवा अमरावती यापैकी तुमचा विभाग निवडा.
- तुमचा आयडी आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करा.
- सबमीट करा आणि अलॉटमेंट निकाल पाहा.

कनिष्ठ महाविद्यालये ९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार दिलेल्या प्रवेशाची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तिसऱ्या फेरीसाठी किती जागा आहेत, त्याचा तपशील १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल.

Syllabus Reduction:'या' राज्याने केली तब्बल ४८ टक्के अभ्यासक्रम कपात!

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विभागनिहाय थेट लिंक पुढीलप्रमाणे आहेत -

नाशिक

मुंबई

नागपूर

पुणे

औरंगाबाद

अमरावती

पुणे विभागात दुसऱ्या यादीत अलॉट झालेल्या शाखानिहाय जागांचा तपशील पुढीलप्रमाणे -

शाखा - अलॉट झालेल्या जागा
कला -- २,६७२
वाणिज्य -- ९,७६२
विज्ञान -- १०,०८९
एचएसव्हीसी -- ५९७

मुंबई विभागात पहिल्या यादीनंतर शिल्लक राहिलेल्या जागांचा शाखानिहाय तपशील

कला - २८,३९०

वाणिज्य- १,३२,८५७

विज्ञान - ७६,१७५

एचएसव्हीसी - ४७९७

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रॉक्टर्ड मेथडने

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज