अ‍ॅपशहर

गोंडवाना विद्यापीठास युजीसीकडून १२- बी दर्जा

गोंडवाना विद्यापीठास युजीसीकडून १२- बी दर्जा मिळाल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2020, 7:06 pm
मुंबई : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडे १२ - बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gondwana university got 12 b status from ugc
गोंडवाना विद्यापीठास युजीसीकडून १२- बी दर्जा


सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला आहे.

सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने १२ – बी चा दर्जा मिळविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केलाआहे. आणि तसे परिपत्रक आज विद्यापीठास पाठविले आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. तसेच या दर्जामुळे विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयांना देखील आयोगाच्या विविध योजनांचा निधी प्राप्त होणार आहे. असेही सामंत यांनी सांगितले

पुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही होणार

गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री श्री.शिंदे आणि महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे सहकार्य करीत आहे. विद्यापीठाला १२-बी चा दर्जा मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन श्री. सामंत यांनी अभिनंदन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज