अ‍ॅपशहर

बारावीच्या परीक्षा कधी होणार? पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असून, मे महिन्यात बारावीच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने होतील, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 8 May 2021, 12:03 pm

हायलाइट्स:

  • बारावीच्या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने?
  • शालेय शिक्षण विभागाने सविस्तर माहिती आणि सूचना प्रसिद्ध करण्याची मागणी
  • परीक्षा ऑनलाइन घेण्याचीही जोरदार मागणी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hsc exam 2021 maharashtra government yet to declare revised dates of 12th exam
बारावीच्या परीक्षा कधी होणार? पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत, याबाबत अजूनही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम आहे. बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाने सविस्तर माहिती आणि सूचना प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असून, मे महिन्यात परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने होतील, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी किमान १५ ते ३० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार की, जूनमध्ये होणार याबाबत कोणतीही सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) जूनच्या पहिल्या आठवड्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेउन बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाकडून 'सीबीएसई'च्या निर्णयाची वाट पाहण्यात येत आहे का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अशा परिस्थिती शालेय शिक्षण विभाग राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने पार पडल्याने, परीक्षा देखील ऑनलाइन घ्याव्यात, असे विद्यार्थी आणि पालकांच्या एक गटाचे मत आहे.

तूर्तास वेट अँड वॉचचे धोरण

'शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळामध्ये बारावीच्या परीक्षांबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा सुरू नाही,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 'सीबीएसई'ने बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर, शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे. तोपर्यंत 'वेट अँड वॉच'चे धोरण शालेय शिक्षण विभागाने अवलंबले आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत अनेक विद्यार्थ्यांकडून पोस्ट शेअर करण्यात येत आहे.

आयआयटीयन्सना हवे 'ना नापास' धोरण; विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण
UGC Guidelines: विद्यापीठांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा न घेण्याचे UGC चे आदेश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज