IBPS PO Recruitment: बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा संपली आहे. आयबीपीएस इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection, IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती केली जाणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या अंतर्गत ६ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पीओच्या एकूण ६४३२ पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार २२ ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर अर्ज करु शकतात. पात्र उमेदवार २ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करू शकतात. यानंतर, जर पीईटी झाली, तर सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण होणार आहे. पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये होईल. याचा निकाल नोव्हेंबरमध्ये येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होईल. याचा निकाल डिसेंबरमध्ये येईल. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची जानेवारी-फेब्रुवारी २०२५ मध्ये मुलाखत घेतली जाईल. ज्यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांना एप्रिल २०२३ मध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिले जाणार आहे.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ८५० रुपये अर्ज शुल्क घेतले जाणार आहे. तर एससी/एसटी/पीएस उमेदवारांकडून १७५ रुपये अर्ज शुल्क घेतले जाणार आहे.
आयबीपीएस पीओ/एमटी पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असावे. म्हणजेच अर्जदाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वी आणि १ ऑगस्ट २०२२ नंतर झालेला नसावा. एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे, ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर) साठी ३ वर्षे, अपंग व्यक्तींसाठी १० वर्षे, किमान पाच वर्षांच्या लष्करी सेवेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे आणि १९८४ च्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्यांना ५ वर्षे इतकी सवलत मिळेल.
IBPS PO 2022: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
देशातील मान्यताप्राप्त संस्थेतील पदवीधर उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पदाचा तपशील
यामध्ये ११ बँका सहभागी होत आहेत मात्र आयबीपीएसने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार ६ बँकांमध्ये ६४३२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २५९६ पदे अनारक्षित, १७४१ ओबीसी, ६१६ ईडब्ल्यूएस, ९९६ एससी, ४८३ एसटी प्रवर्गातील आहेत. बँकनिहाय तपशील खाली दिलेला आहे-
बँक ऑफ इंडिया: ५३५ पदे
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: २५०० पदे
पीएनबी: ५०० पदे
पंजाब अँड सिंध बँक: २५३ पदे
यूको बँक: ५५० पदे
युनियन बँक ऑफ इंडिया: २०९४ पदे