अ‍ॅपशहर

ICSE दहावी, बारावी निकालात महाराष्ट्राची कामगिरी

आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या निकालात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी कशी कामगिरी केली आहे...जाणून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2020, 6:39 pm
CISCE अर्थात काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. महाराष्ट्रात दहावीचा निकाल ९९.९२ टक्के तर बारावीचा निकाल ९८.५३ टक्के इतका लागला आहे. राज्यात एकूण २२६ केंद्रांवर दहावीची तर ५१ केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम icse 10th 12th result maharashtra icse result pass percentage
ICSE दहावी, बारावी निकालात महाराष्ट्राची कामगिरी


महाराष्ट्रात दहावीला एकूण २३,३३६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २३,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीला एकूण ३,१५० विद्यार्थ्यांपैकी ३,१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावी आणि बारावीला अनुक्रमे १७ आणि ४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

दहावीची एकूण ६१ लेखी विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २२ भारतीय तर नऊ परदेशी भाषा होत्या. बारावीची एकूण १५ भारतीय आणि सहा परदेशी भाषांसह ५१ लेखी विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

परीक्षा केंद्रे

इयत्ता - देश -- राज्य
दहावी - २३४१ -- २२६
बारावी - ११२५ -- ५१

ICSE Results 2020: आयसीएसई दहावी, बारावीच्या निकालाचे ताजे अपडेट्स

कसा पाहाल निकाल?

काउन्सिलच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा.
रिझल्ट्स 2020 या लिंक वर क्लिक करा.
कोर्स ऑप्शन वर जाऊन ISCE / ISC 2020 result पैकी एकाची निवड करा.
नवे पेज उघडेल. येथे आपलाअपनी युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
निकाल स्क्रीन वर दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

ICSE: दहावीचा निकाल ९९.३४ %, बारावीचा निकाल ९६.८४ %

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मुला-मुलींचे प्रमाण -

विद्यार्थी - १२,७४७ (५४.६२ टक्के)
विद्यार्थिनी - १०,५८९ (४५.३८ टक्के)

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या मुला-मुलींचे प्रमाण -


विद्यार्थी - १,४७० (४६.६७ टक्के)
विद्यार्थिनी - १,६८० (५३.३३ टक्के)

दहावी, बारावीचा निकाल कधी? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता -
cisce.org
results.cisce.org

गुणवत्ता यादी नाही

यंदा कोविड - १९ च्या परिस्थितीमुळे निकालाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर्षी अत्यंत अपवादात्मक परिस्थिती असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांची नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने कळवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज