अ‍ॅपशहर

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावी फेरपरीक्षांची नोंदणी सुरू

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार आणि फेरपरीक्षांची नोंदणी सुरू ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2020, 12:00 pm
काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) म्हणजेच आयसीएसई बोर्डाने ICSE आणि ISC म्हणजेच दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार आणि फेरपरीक्षांची नोंदणी सुरू केली आहे. यासंदर्भातील माहिती बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम icse board 10th 12th compartment and class improvement exams registration process begins
ICSE बोर्डाच्या दहावी, बारावी फेरपरीक्षांची नोंदणी सुरू


दहावी, बारावी कंपार्टमेंटल आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा २०२० साठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अखेरची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. करोना काळात आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या ज्या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले त्या विषयांसाठी देखील श्रेणीसुधार परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे असे कोणते विषय असतील तर त्यांचीही विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.

श्रेणीसुधार परीक्षांमध्ये मिळणारे गुण हे अंतिम असतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

पालिकेचे ऑनलाइन वर्ग राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले

आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट आणि श्रेणीसुधार परीक्षांच्या नोंदणीबाबतचे सर्क्युलर -



सीबीएसई बोर्डाची फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या फेरपरीक्षा तसेच श्रेणीसुधार परीक्षा २२ सप्टेंबरपासून होणार आहेत. या परीक्षा देण्यासाठी दहावीचे विद्यार्थी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडणार आहेत. बारावीचे विद्यार्थी यापूर्वी जेईई आणि नीट परीक्षांच्या निमित्ताने परीक्षा केंद्रांपर्यंत जाऊन आले आहेत. दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज