अ‍ॅपशहर

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात यंदा २५ टक्के कपात

आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचा या वर्षीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2020, 12:13 pm
नवी दिल्ली: काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने शैक्षणिक वर्ष २०२१ साठी इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे. कोविड - १९ महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तसेच लॉकडाऊन स्थितीमुळे १६ मार्चपासून शाळा बंद आहेत. या काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे बोर्डाने शुक्रवारी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम icse board cisce reduces class x xii syllabi by up to 25
ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात यंदा २५ टक्के कपात


बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून म्हणाले, 'नोवेल करोना व्हायरसमुळे जागतिक पातळीवर परिणाम झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा गेले तीन महिने बंद आहेत. CISCE संलग्न शाळांनी या परिस्थितीशी जुळवून घेत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे, तरीही अध्यापनाच्या तासांचे आणि एकूणच शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे.'

'हे नुकसान भरून काढण्यासाठी बोर्डाने विषय तज्ज्ञांसोबत काम करत दहावी आणि बारावीच्या सर्व महत्त्वाच्या विषयांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र असे करताना या विषयांच्या गाभ्याला हात लागणार नाही, याची पुरेशी काळजी घेतलेली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: CA May 2020 परीक्षा रद्द; ICAI ने केले जाहीर

ATKTच्या निर्णयामुळे खोळंबला विद्यापीठांचा प्रमोट फॉर्म्युला

सध्या तरी अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे; मात्र करोनाची स्थिती लवकर सामान्य झाली नाही तर कदाचित अभ्यासक्रम कपातीचं प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गरज भासू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

अराथून म्हणाले, 'जुलैपर्यंतचे शैक्षणिक नुकसान म्हणजेच सुमारे ४५ दिवसांचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम २० ते २५ टक्के कमी करत आहोत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा ऑलाइन वर्ग सुरू करत आहेत. त्यामुळे हे नुकसान पुढेही होणार आहे. म्हणूनच पुढेही आढावा घेऊन गरज भासल्यास या दोन इयत्तांचा अभ्यास आम्ही ५० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.'

हेही वाचा: JEE Main, NEET परीक्षा दोन महिने पुढे ढकलल्या

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देखील अभ्यासक्रम कमी करण्याची प्रक्रिया सुरू केल आहे. संबंधित लोकांकडून बोर्डाने सूचना मागवल्या आहेत. मात्र नेमका किती सिलॅबस कमी केला जाणार वा नाही याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज