IIGM Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (Indian Institute of Geomagnetism, IIGM)येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम अंतर्गत प्राध्यापक (Professor), वाचक (Reader), सहकारी (Assistant), वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator), अधीक्षक (Superintendent), सहाय्यक (Assistant), उच्च विभाग लिपिक, (Higher Department Clerk)निम्न विभाग लिपिक (Lower Department Clerk), स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II) ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून दहावी, बारावी, पदवी, मास्टर डिग्री पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार २७ वर्षे ते ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
IIGM Recruitment: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार, आयआयजी, भूखंड क्र. ५, सेक्टर १८, कळंबोली महामार्ग, नवीन पनवेल, नवी मुंबई ४१०२१८ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. २२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा