Intermediate Drawing Grade Result: शासकीय रेखाकला परीक्षा २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड निकाल (Intermediate Drawing Grade Result) जाहीर करण्यात आलाआहे. राज्याच्या कला संचालनालयतर्फे (Directorate of Arts)याबद्दल माहिती जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा दिलेले विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. हा निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट पोस्टाद्वारे पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड निकाल (Elementary Drawing Grade Result) अधिकृत वेबसाइट https://dge.doamh.in/ वर तपासता येणार आहे. सहभागी शाळांचे तसेच खासगी विद्यार्थ्यांचे निकाल (Private Student Result) २० मे ते २३ मे २०२२ या कालावधीत जाहीर केले जात आहेत.
कला संचालनालयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार हे निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख हा तपशील भरुन निकाल तपासता येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊलोड करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात त्रुटी असेल त्यांत दुरुस्ती करण्याकरीता लॉगइनवर टॅब देण्यात आला आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्क भरावा लागणार आहे.
एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यातील इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल २३ मे २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा