IPS Success Story: वडील आणि लेकीचं नातं खूपच भावनिक असतं. जन्माला आल्यापासून मुलीचं करिअर होईपर्यंत बाप लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. लेकीचं स्वप्न पूर्ण झाल्यावर वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. अशीच एक भावनिक यशाची कहाणी तेलंगणा येथून समोर आली आहे. आयपीएस सिंधू शर्माच्या यशाची कहाणी तुम्हाला प्रेरणा देईल. पोलीस उपायुक्त ए.आर. उमामहेश्वर सरमा हे तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) जाहीर सभेत ड्युटीवर होते. जगत्याल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सिंधू सरमाही त्याच ठिकाणी उपस्थित होत्या. कार्यक्रमात जमलेल्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सिंधूकडे होती.
आयपीएस सिंधू शर्मा ही भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहे. तिने २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती तेलंगणा केडरची अधिकारी आहे. सिंधू शर्मा आणि उमामहेश्वर यांच्यात बाप लेकीचं नातं आहे. याचा उमामहेश्वर यांना खूप अभिमान आहे. आपल्या लेकीचं ते तोंडभरुन कौतुक करीत असतात.
'ती माझी वरिष्ठ अधिकारी आहे. ड्युटीवर असताना मी तिला सॅल्यूट करतो. घरी असल्यावर आम्ही वडील आणि मुलीच्या भूमिकेत असतो. कामाच्या ठिकाणी, घराशी संबंधित विषयांवर आम्ही कधीही चर्चा करत नाही. कर्तव्य बजावत असताना आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो होतो. ड्युटीवर आणि घरातील आमचे नाते पूर्णपणे वेगळे आहे. सिंधूने पदवीनंतर सेवेत करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला खूप आनंद झाल्याचेही ते सांगतात.
उममहेश्वर यांनी १९८५ मध्ये पोलीस खात्यात उपनिरीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची मुलगी सिंधू २०१४ मध्ये आयपीएस अधिकारी झाली. त्यांच्या चार वर्षांच्या सेवेत, वडील आणि मुलगी दोघेही एकाच ठिकाणी नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ होती. लेकीला सॅल्यूट करण्याची आठवण आपण आयुष्यभर जपून ठेवू असेही ते आनंदाने सांगतात.