ISC, ICSE Exam Date 2023: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, ISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसदर्भात अपडेट जाहीर करण्याात आले आहे. यानुसार बारावीची परीक्षा १३ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce. org वर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेच्या तारखांसोबतच मंडळाने निकालाची तारखेसंदर्भातही अपडेट देण्यात आली आहे. दहावी, बारावीचे निकाल मे २०२३ मध्ये जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत प्रकाशनानुसार आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा २७ फेब्रुवारीपासून इंग्रजी भाषेसह सुरू होतील. बोर्डाच्या परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. इयत्ता दहावी, बारावीच्या वेळापत्रकात पेपर लिहिण्याच्या वेळेशिवाय प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे देखील नमूद केली आहेत.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत जेवढे प्रश्न नमूद केले आहेत तेवढेच प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला जातो.
उत्तरपत्रिकेवरील सर्व नोंदी केवळ काळ्या/निळ्या बॉल-पॉइंट पेनने केल्या पाहिजेत.
कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, हात, डेस्क किंवा इतर प्रकारचे कॅल्क्युलेटिंग मशीन वापरण्याची परवानगी नाही.
रफ वर्कसह सर्व काम त्याच शीटवर केले पाहिजे ज्यावर उर्वरित उत्तरे दिली आहेत.
या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना ८ वाजून ४५ मिनिटांनी वितरित केल्या जातील. दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना १ वाजून ४५ मिनिटांनी वितरित केल्या जातील.
महत्वाच्या बाबी