JAM 2022 Answer key: आयआयटी जॅम उत्तरतालिकेची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology, IIT) रुरकीने JAM २०२२ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. JAM २०२२ चा निकाल २२ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जाऊन JAM २०२२ ची उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. सर्व ७ विषयांच्या पेपरसाठी उत्तरतालिका स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. JAM २०२२ साठी रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका देखील जाहीर करण्यात आली आहे. JAM २०२२ परीक्षेत मिळालेले गुण मोजण्यासाठी उमेदवारांना याची मदत होते. उमेदवारांना JAM उत्तरतालिकवर आक्षेप नोंदवता येणारआहे. नोंदवलेल्या प्रत्येक आक्षेपासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. JAM उत्तरतालिकेवरील आक्षेपांचे मूल्यमापन केले जाईल. वैध असणार्या आक्षेपांच्या आधारे उत्तरतालिका अपडेट केली जाईल. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे निकाल तयार केला जाईल. JAM २०२२ चा निकाल २२ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.
JAM 2022 Answer Key: अशी तपासा
उमेदवारांनी सर्वप्रथम JAM २०२२ वेबसाइटवर जा.
'JAM 2022 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका" या लिंकवर क्लिक करा.
चाचणी पेपर, उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका तपासा.
तुम्ही अर्ज केलेल्या चाचणी पेपरची उत्तरतालिका निवडा.
JAM 2022 Answer Key: असा नोंदवा आक्षेप
अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
JAM उत्तरतालिकेवर आक्षेप हा पर्याय निवडा.
JOAPS पोर्टलवर जा.
नावनोंदणी आयडी, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर, "सबमिट" टॅबवर क्लिक करा.
JAM उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवा.
JAM २०२२ ची उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा