अ‍ॅपशहर

JEE Main Result: निकालानंतर फेरतपासणीची संधी नाही

जेईई मेन फेब्रुवारी सत्र परीक्षेचा निकाल सोमवारी ८ मार्च रोजी जाहीर झाला. ही परीक्षा यंदा ४ वेळा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी आहे. मात्र निकाल लागल्यानंतर रिचेकिंग वा रिइव्हॅल्युएशन होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2021, 12:16 pm
JEE Main Result 2021: जेईई मेन २०२१ चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळांवर jeemain.nta.nic.in आणि nta.ac.in वर जाहीर केला आहे. सर्व उमेदवारांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे की NTA जेईई मेन निकाल 2021 साठी रि-इव्हॅल्यूएशन आणि री-चेकिंगची परवानगी देणार नाही. जेईई मेन 2021च्या परिपत्रकानुसार, 'निकालाचे पुनर्मूल्यांकन / पुनर्तपासणी होणार नाही. यासंबंधी कोणतीही मागणी स्वीकारली जाणार नाही.'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jee main february result 2021 no rechecking or re evaluation of result
JEE Main Result: निकालानंतर फेरतपासणीची संधी नाही


जेईई मेन रिजल्ट 2021 च्या स्कोरकार्डमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या पहिल्या प्रयत्नातील एकूण गुण, विषयनिहाय गुण आणि वैयक्तिक माहिती उदा. उमेदवाराचे नाव, आई-वडिलांचे नाव, अर्जांची संख्या आदींचा समावेश आहे.

जेईई मेनचा निकाल निकालाच्या तारखेच्या ९० दिवसांपर्यंतच डाऊनलोड केला जाऊ शकेल. या दरम्यान स्कोरकार्ड अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध राहील.

जेईई मेन परीक्षा 2021 जर दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीत मिळालेल्या सर्वाधिक गुणांचा विचार करून रँक ठरवला जाईल. जर हेही गुण सारखेच असतील तर वयोमर्यादेनुसार रँक ठरतो. ज्या उमेदवाराचं वय अधिक त्याचा रँक वरचा असतो.

JEE Main Result 2021: जेईई मेन फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर

६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल


या परीक्षेत सहा विद्यार्थ्यांचा शंभर पर्सेंटाइल स्कोअर आला. यामध्ये राज्यस्थानचा संकेत झा, चंदिगडचा गुरुमित सिंग, महाराष्ट्राचा सिद्धांत मुखर्जी, गुजरातचा अनंत किडांबी, दिल्लीचा रंजीम दास आणि प्रवर कटारिया यांचा समावेश आहे. ९९ पर्सेंटाइल असलेल्या विद़यार्थ्यांची संख्या ४१ एवढी आहे. राज्यातील अर्णव कलगुटकर हा दिव्यांग गटातून राज्यत पहिला तर देशात दुसरा आला आहे. चार ट्रान्सजेंडर विद्यार्थीही परीक्षेला बसले होते. ही परीक्षा २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारीला घेण्यात आली.

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज