अ‍ॅपशहर

इंटेलिजन्स ब्युरोत अनेक पदांवर भरती

इंटेलिजन्स ब्युरो अर्थात गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2020, 6:52 pm
नवी दिल्ली: देशाची प्रतिष्ठित संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB) म्हणजेच गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. तुम्हालाही देशसेवा करण्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करायचे आहेत. या अर्ज प्रक्रियासाठी १९ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयबी


पदांची नावे


असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर - १ / एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट सेंट्रल इंजेलिजन्स ऑफिसर - २ / एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - १ / एक्झिक्युटिव्ह, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर (ग्रेड १ आणि २), सिक्युरिटी ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर, सीनिअर रिसर्च ऑफिसर, लायब्ररी आणि सूचना अधिकारी, पर्सनल असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, महिला स्टाफ नर्स, केअरटेकर, सिक्युरिटी असिस्टंट आणि स्वयंपाकी.

पदांची एकूण संख्या - २९२

वयोमर्यादा - कमाल वय ५६ वर्षे (आरक्षण नियमांनुसार सवलत)

शैक्षणिक पात्रता

पदानुसार विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक.

वेतन


पदानुसार विविध वेतनश्रेणी. उमेदवारांना ५ हजार २०० रुपयांपासून १,५१,१०० रुपयांपर्यंत प्रति महिना वेतन.

अर्ज कसा करायचा?

या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जानुसार, योग्य ती कागदपत्रे जोडून पुढील पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

अर्ज करायचा पत्ता - जॉइंट डेप्युटी डायरेक्टर / जी, इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ३५, एस.पी. मार्ग, बापू चाम, नवी दिल्ली - २१

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज