अ‍ॅपशहर

मुंबईत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती

भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड या केंद्र सरकारी कंपनी भरती सुरू आहे. इच्छुकांनी अर्ज कसा करायचा आहे याची माहिती जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2020, 11:12 am
Bharat Electronics Limited (BEL) recruitment 2020: जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर केंद्र सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. बीईएल मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर आणि ट्रेनी इंजिनीअर या दोन पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. बीईएलची अधिकृत वेबसाइट bel-india.in द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jobs in mumbai bel recruitment 2020 project engineers and trainee engineers vacancy
मुंबईत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती


या भरतीसाठी आवश्यक माहिती, नोटिफिकेशन, अर्जाची लिंक, अधिकृत संकेतस्थळाची थेट लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदांची माहिती

प्रोजेक्ट इंजिनीअर - ३० पदे
ट्रेनी इंजिनीअर - २५ पदे
एकूण पदांची संख्या - ५५

अर्जांची माहिती

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ जुलै २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ ऑगस्ट २०२० आहे.

हेही वाचा: HCL कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या

एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. अन्य उमेदवारांकरिता ट्रेनी इंजिनीअरसाठी २०० रुपये तर प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्याचं शुल्क ५०० रुपये आहे.

आवश्यक पात्रता

उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठाची बीई किंवा बीटेक् पदवी आवश्यक. बीई किंवा बीटेक् इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इ अँड टी / टेलीकम्युनिकेशन / ईईई / मेकॅनिकल शाखेतून केलेले असावे.

हेही वाचा: केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती

वयोमर्यादा

ट्रेनी इंजिनीअर पदांसाठी उमेदवारांचे वय जास्तीत जास्त २५ वर्षे आणि प्रोजेक्टे इंजिनीअरसाठी जास्तीत जास्त २८ वर्षे वयोमर्यादा आहे. आरक्षण नियमानुसार सवलतीचा लाभ मिळेल. वयाची गणना १ जुलै २०२० पर्यंत केली जाईल.

निवड प्रक्रिया

इच्छुक आणि योग्य उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी आणि मुलाखतीच्या आधारे होईल.

हेही वाचा: स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे हजारो पदांवर भरती

भरती कुठे?

ट्रेनी इंजिनीअरच्या २० पोस्ट मुंबईत भरल्या जाणार आहेत तर प्रोजेक्ट इंजिनीअरच्या ३० पोस्ट बंगळुरूतील आहेत.

हेही वाचा: सीआरपीएफ भरती: अर्ज भरायला सुरुवात

ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी

या भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी संबंधित प्रोजेक्टच्या लिंकवर क्लिक करा -

K-FON Project
Advanced Defence Systems

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

BEL च्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज