अ‍ॅपशहर

लतादीदींना राज्य सरकारने दिले 'बर्थ डे' गिफ्ट!!

मुंबईत 'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2020, 6:44 pm
मुंबई: गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत 'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' सुरू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lata mangeshkar birthday special maharashtra government announced government music college
लतादीदींना राज्य सरकारने दिले 'बर्थ डे' गिफ्ट!!


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगितकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारकडून लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील. असे सांगून सामंत यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज