अ‍ॅपशहर

एलआयसीत भरती; वार्षिक १४ लाखांपर्यंतचे पॅकेज!

एलआयसीत काही पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2020, 11:42 am
LICHFL Vacancy 2020: जीवन विमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (HFL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजर पर्यंतच्या पदांवर भरती होणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांचे पे-स्केल वार्षिक १४ लाख रुपयांपर्यंत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lic recruitment 2020 vacancy in lic hfl check details how to apply
एलआयसीत भरती; वार्षिक १४ लाखांपर्यंतचे पॅकेज!


जर तुमच्याकडे एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री असेल तर तुमच्याकडे ही सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन करण्याच्या थेट लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत.

पदांची माहिती

मॅनेजमेंट ट्रेनी - ९ पदे
असिस्टंट मॅनेजर - ११ पदे
एकूण संख्या - २० पदे

३० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत आहे.

अर्ज कसा करायचा?


अर्ज ऑनलाइन माध्यमातून करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरता येईल. अर्ज प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी नि:शुल्क आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL 2020 परीक्षेच्या अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ


निवड प्रक्रिया

या नोकऱ्यांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. मेरिटच्या आधारे थेट भरती होईल.

नोकरी आली धावून: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये व्हा अधिकारी

थेट लिंक्स
LICHFL Job Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टेट बँक ऑफ इंडियात भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज