अ‍ॅपशहर

एमसीए डिग्री अभ्यासक्रम आता केवळ २ वर्षांचाच

एमसीए डिग्री कोर्सचा कालावधी कमी करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2020, 3:34 pm
कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये मास्टर्स करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता MCA डिग्री कोर्स केवळ दोन वर्षांचाच असणार आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंबंधी काउन्सिलने परिपत्रकदेखील जारी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mca degree course to now take only 2 years declared aicte
एमसीए डिग्री अभ्यासक्रम आता केवळ २ वर्षांचाच


परिपत्रकात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सचिव राजीव कुमार म्हणाले, 'विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत एमसीए अभ्यासक्रमाचा अवधी तीन वर्षांहून कमी करत दोन वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.'

आता एआयसीटीईने अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काऊन्सिलने सर्व संलग्न महाविद्यालयांना हे सर्क्युलर पाठवले आहे.



यापूर्वी एमसीए कोर्स दोन वर्षे आणि तीन वर्षे अशा दोन वेगवेगळ्या मुदतीचा होता. जे विद्यार्थी बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए केल्यानंतर एमसीए करायचे, त्यांची डिग्री दोन वर्षांत पूर्ण होत होती. मात्र अन्य विद्यार्थी जे पदवीत गणितासह अन्य अभ्यासक्रम करायचे त्यांना तीन वर्षे कालावीधीचा एमसीए अभ्यासक्रम करावा लागायचा. पण आता सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एमसीए कोर्स दोन वर्षांचाच असेल.

विद्यापीठ परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या UGC च्या सूचना; राज्याच्या निर्णयाला धक्का

यूजीसीच्या ५४५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उमेदवरांनी बीसीए म्हणजेच बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा बीएससी / बीकॉम / गणित घेऊन बी.ए.ची पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा ज्यांना अकरावी, बारावी गणित विषय होता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवले आहेत, असे सर्व एमसीए कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

एमसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. २०१९-२२ मध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या २०१५-१६ च्या तुलनेने खूपच कमी झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी या अभ्यासक्रमाला यावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज