अ‍ॅपशहर

MCGM Recruitment 2021:पालिकेत बंपर भरती,३० हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार

मुंबई महापालिकेत २ हजारहून अधिक पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये पात्र उमेदवारास ३० हजाराहून २ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज करायचा आहे. २६ जून ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2021, 1:55 pm
MCGM Recruitment 2021:मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती आहे. पालिकेत २००० हून अधिक जागा रिक्त असून ३० हजाराहून २ लाखापर्यंत पगार मिळणार आहे. २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर पालिकेने स्टाफ नर्स, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ३ महिन्याच्या करारावर जम्बो कोविड सेंटरमध्ये ही भरती असणार आहे. पालिकेच्या वेबसाइटवर याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम MCGM Recruitment 2021:पालिकेत बंपर भरती, ३० हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार


पात्रता, पगार, रिक्त जागा, अर्ज करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -२६ जून २०२१

एमसीजीएम रिक्त जागांचा तपशील

स्टाफ नर्स - ९०० ते १००० जागा
सहाय्य वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस - ९०० ते १००० जागा
वरिष्ठ सल्लागार आणि इंटेन्सिव्हिस्ट (एमडी-मेडिसिन -१५ जागा) इंन्टेस्थेटिस्ट (एमडी -१० जागा) नेफ्रोलॉजिस्ट (डीएम -३ जागा) कार्डियोलॉजिस्ट (DM -१ जागा) न्यूरोलॉजिस्ट (डीएम -१) - ५० ते ७० पोस्ट
DRDO DRL Bharti 2021:डीआरडीओमध्ये भरती, ५४ हजार पगार
खुशखबर! राज्यातील ५ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी
पगार

प्रशिक्षित स्टाफ नर्स - ३० हजार
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी - ८० हजार रुपये (एमबीबीएस), ६० हजार रुपये(बीएएमएस) आणि ५० हजार रुपये (बीएचएमएस)
वरिष्ठ सल्लागार -एमडी उमेदवारांसाठी दीड लाख रुपये आणि डीएम उमेदवारांसाठी २.०० लाख रुपये

स्टाफ नर्स, सहाय्यक एमओ आणि सल्लागार पदांसाठी पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

वरिष्ठ सल्लागारपद- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सुपरस्पेशलिटी पदवी असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार एमएमसी (MMC) किंवा एमसीआय(MCI)कडे नोंदणीकृत असावा.

सहाय्य वैद्यकीय अधिकारी- पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी धारक असावा. उमेदवार एमएमसी ( MMC) किंवा एमसीआय (MCI) किंवा संबंधित संस्थेत नोंदणीकृत असावा.

प्रशिक्षित कर्मचारी परिचारिका - उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त नर्सिंग काऊन्सिलचा जीएनएम डिप्लोमा धारक असावा. महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलमध्ये उमेदवाराची नोंदणी असावी.

वय मर्यादा:
यामध्ये उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावा आणि ३३ वर्षांवर नसावे.

अर्ज कसा करावा?
अर्जाची प्रमाणपत्रे covid19mcgm@gmail.com किंवा stenodeanl@gmail.com वर ४ वाजेपर्यंत ईमेल करा. नवीन स्कॅन केलेल्या कागदपत्र २६ जून २०२१ पर्यंत पाठवावे लागतील. यानंतर आलेल्या कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज